डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:17 AM2019-10-22T01:17:31+5:302019-10-22T01:18:05+5:30

Maharashtra Election 2019: डहाणू मतदारसंघात वाढवण बंदर विरोध, डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्याचे प्रयत्न, भात कापणी हंगाम, सलग सुट्टी आणि ढगाळ वातावरण आदींचा परिणाम मतदानाचा टक्का घसरताना दिसला.

Maharashtra Election 2019: Response to the creation of a well-polled, well-polled polling station | डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद

डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद

Next

डहाणू/बोर्डी : डहाणू मतदारसंघात वाढवण बंदर विरोध, डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्याचे प्रयत्न, भात कापणी हंगाम, सलग सुट्टी आणि ढगाळ वातावरण आदींचा परिणाम मतदानाचा टक्का घसरताना दिसला. येथे भाजपचे पास्कल धनारे आणि माकपाचे विनोद निकोले यांच्यातच प्रमुख लढत रंगणार आहे. युवा, ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेला तसेच दिव्यांग आणि महिला मतदान केंद्राच्या उभारणीने निर्माण झालेले उत्साही वातावरण या जमेच्या बाजू ठरल्या. मतदानाच्या पहिल्या सत्रात सात ते आठ मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या. त्या दुरु स्त करण्यात आल्या. दरम्यान, नरपड मतदान केंद्रावरील शंभर वर्षीय अरुण पाटील यांनी चालत येऊन केलेले मतदान लक्षवेधी क्षण होता.

दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाच्या पाण्याच्या सरी पडल्या होत्या. मात्र सोमवारी मतदानाच्या दिवशी आभाळ निरभ्र होते. सकाळी मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर ७ ते ११ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २६.१७ टक्के होते. वाढवण बंदराला असलेला विरोध आणि डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्याचा परिणाम मतदानाच्या बहिष्कारातून डहाणू मतदारसंघातील किनाऱ्यालगत गावांमधील मतदानावर पडत असल्याची चर्चा होऊ लागली होती. तर सलग सुट्ट्यांमुळे शहरी मतदारांनी बाहेर गावी जाणे पसंत केले. शिवाय आॅक्टोबर हीट आणि आर्द्रतेत वाढ झाल्याने काही घराबाहेर पडले नाहीत.

डहाणू शहरातील मल्याण येथे दिव्यांग मतदान केंद्राची (२०२) उभारणी केली होती. येथे २४ पैकी १७ दिव्यांगानी मतदान केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक होऊन दिव्यांग वाहनातून मतदार उतरल्यानंतर त्यांना व्हीलचेअरच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहचविण्यचे काम केले. तर कंक्र ाडी येथील नंदोरे १८९ हे सखी मतदान केंद्र होते. येथे तैनात सर्व कर्मचारी या महिला होत्या. सध्या भात कापणी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी आणि चिकू फळतोड मजुरांनी दुपारनंतर मतदान करण्यास प्राधान्य दिला. त्यामुळे मतदानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र दिसले. तर नरपड येथील १०० वर्ष, ७ मिहन्यांचे वय असलेल्या अरूण महादेव पाटील यांनी राहत्या घरातून केंद्रापर्यंत चालत येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांचा उत्साह पाहून सर्वच वयोगटातील ग्रामस्थ त्यांच्या स्वागताला उपस्थित राहून सेल्फी काढल्या.

तर आगर येथील मतदान केंद्रावर संजय आणि संदेश पाटील या जुळ्या भावांनी एकत्र येऊन केलेल्या मतदानाचा क्षण केंद्रावर लक्षवेधी ठरला. सायंकाळी पाच वाजेनंतर हलक्या स्वरुपात पावसाला प्रारंभ झाला होता. दरम्यान युवक, ज्येष्ठ नागारिक, दिव्यांग आणि सखी मतदान केंद्राच्या उभारणीने सकारात्मक वातावरण निर्माण केले. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना केंद्रापर्यंत घेऊन येण्याचे कार्य केल्यानेच मतदानाचा आकडा वाढण्यास मदत झाली.

 

 

Web Title: Maharashtra Election 2019: Response to the creation of a well-polled, well-polled polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.