Maharashtra Election 2019: पालघर मतदारसंघासाठी डहाणूची मते निर्णायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 02:01 AM2019-10-18T02:01:45+5:302019-10-18T02:02:07+5:30

Maharashtra Election 2019: मदार डहाणूच्या मतांवर : डहाणूची ७० गावे पालघरमध्ये, उमेदवारांचाही तेथे प्रचारावर भर

Maharashtra Election 2019: Dahanu votes crucial for Palghar constituency? | Maharashtra Election 2019: पालघर मतदारसंघासाठी डहाणूची मते निर्णायक?

Maharashtra Election 2019: पालघर मतदारसंघासाठी डहाणूची मते निर्णायक?

googlenewsNext

- शशिकांत ठाकूर

कासा : दहा वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघाच्या पुर्नरचनेत डहाणू तालुक्यातील ७० गावांचा समावेश पालघर मतदारसंघात करण्यात आला. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघर मतदार संघाचे चित्र बदलत राहिले आहे आणि बरीचशी मदारही डहाणूच्या मतांवर राहिली आहे.

पालघर मतदारसंघात डहाणूतील चिंचणी तसेच कासा या दोन महसूल सर्कलचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चिंचणी सर्कलमधील २३ गावे, ६९ मतदान केंद्रे तर कासा सर्कलमधील ४७ गावे आणि ७० मतदान केंद्रे आहेत. पालघर मतदार संघात एकूण ३२२ मतदान केंद्रे असून यात डहाणू तालुक्यातील १३९ मतदान केंद्रे आहेत. तर पालघर तालुक्यात १८३ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार ९९४ मतदार आहेत. यापैकी सुमारे १ लाख १५ मतदार हे डहाणू तालुक्यातील आहेत. दरम्यान, मतदार संघ पुनर्रचनेपूर्वी पालघर मतदारसंघात सेनेचे तर डहाणू मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित सेनेच्या मनीषा निमकर यांचा २१ हजार ९६२ मतांनी पराभव करून विजयी झाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत डहाणूचे माजी आ. कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत प्रवेश करत सेनेची उमेदवारी मिळवून काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यासमोर आव्हान उभे केले. त्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार ४६ हजार १४२ मते तर काँग्रेस उमेदवारास ४५ हजार ६२६ मते मिळाली होती. सेना उमेदवार ५१५ मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत भाजपने सेना उमेदवारास पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे.

समस्यांनी नागरिक त्रस्त

डहाणूतील कासा, गंजाड, वाणगाव आदिवासी भाग असून आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, रोजगार अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या भागातील मतदारावर उमेदवारांनी प्रचारात जास्त लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत आहे. पालघर मतदारसंघात डहाणूतील चिंचणी तसेच कासा या दोन महसूल सर्कलचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Dahanu votes crucial for Palghar constituency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.