झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:18 IST2023-05-17T14:18:11+5:302023-05-17T14:18:51+5:30
लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
तलासरी : तलासरीजवळील बारड डोंगरावरील जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ललिता चंदऱ्या राहया (२०) आणि प्रदीप वनेश राजड (१९) अशी या प्रेमीयुगुलाची नावे असून ते दोन्ही तलासरी तालुक्यातील राहणारे होते.
मौजे करजगाव येथील बारड डोंगरावर जंगलातील झाडाला एकाच दोरीने दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या दोघांचाही वेगवेगळ्या मुला आणि मुलीसोबत कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी केल्याच्या रागातून या दोघांनीही आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांचेही मृतदेह खाली उतरवले. यासंदर्भात तलासरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तलासरी पोलिस अधिक तपास करत आहेत.