मीरा-भाईंदरमध्ये २ ठिकाणी वीज पडली, थरारक घटनेचा व्हिडिओ कैद

By धीरज परब | Updated: September 8, 2022 21:09 IST2022-09-08T21:06:30+5:302022-09-08T21:09:42+5:30

वीज कडाडत असताना राई गावातील एक ग्रामस्थ त्यांच्या घराच्या खिडकीतून मोबाईल द्वारे व्हिडीओ काढत होते

Lightning strikes at 2 places in Meera-Bhyander, video capture of thrilling incident | मीरा-भाईंदरमध्ये २ ठिकाणी वीज पडली, थरारक घटनेचा व्हिडिओ कैद

मीरा-भाईंदरमध्ये २ ठिकाणी वीज पडली, थरारक घटनेचा व्हिडिओ कैद

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये २ ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या असून एका घटनेचा थरारक  व्हिडीओ नागरिकाने काढला आहे. बुधवारी रात्री मोठ्या गडगडाटा सह विजा कडाडत होत्या . लखलखणाऱ्या आणि कडाडणाऱ्या विजां मुळे भीतीचे वातावरण होते .  त्यातच  मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत व भाईंदर पश्चिमेस राई गावातील तलाव जवळ अश्या दोन ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या. 

वीज कडाडत असताना राई गावातील एक ग्रामस्थ त्यांच्या घराच्या खिडकीतून मोबाईल द्वारे व्हिडीओ काढत होते . त्याच वेळी प्रचंड मोठा आवाज करत विज पडली आणि प्रखर प्रकाशाने परिसर झळाळून गेला . त्या प्रचंड कडाक्याच्या आवाजाने व्हिडीओ काढणाऱ्या ग्रामस्थाचा थरकाप उडाला व त्याने घरात पळ काढला . वीज पडली तेव्हा आगीची एक रेष उमटली. ह्या घटनेची माहिती महापालिके कडे नोंदवली गेलेली नसल्याचे समजते. तर शहरात वीज रोधक यंत्रणाच महापालिकेने बसवलेली नसल्याने वीज पडण्याच्या या घटनांनी त्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 
 

Web Title: Lightning strikes at 2 places in Meera-Bhyander, video capture of thrilling incident