शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले थेट सर्वोच्च न्यायालयातील कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:01 PM

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा उपक्रम : अन्य महत्त्वाच्या संस्था आणि विभागांनाही भेट

हितेन नाईकपालघर : सर्वोच्च न्यायालय या देशातील प्रमुख न्यायालयातील कामकाज पाहणे, अनुभवणे हा कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अनुभव. ्रपालघरमधील सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास दौऱ्यांतर्गत नुकतीच सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली. याचबरोबर देशातील अत्यंत महत्त्वाच्या संस्था आणि विभागांचे कामकाजही अनुभवले. या विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा व प्रा. अ‍ॅड. विनोद गुप्ता यांनी केले होते. या अभ्यास दौºयात महाविद्यालयाच्या ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ४ ते ११ जानेवारी दरम्यान एका विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन केले होते. जालियनवाला बागेतील ऐतिहासिक घटनेच्या स्मारकाला वंदन करून या विद्यार्थ्यांच्या दौºयाला सुरुवात झाली. त्यानंतर भारत - पाक अटारी सीमेवर भारतीय लष्करामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमधे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्यक्ष कामकाज अनुभवणे हे या दौºयाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने ऐतिहासिक वास्तू, कोर्ट रूम, न्यायदान प्रक्रिया, वाचनालय, बार रुम याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे सेक्रेटरी आणि लेखक अ‍ॅड. अशोक अरोरा यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. अभ्यास दौºयात पुढे राष्ट्रीय हरित न्यायालयातील कामकाज आणि कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

त्याचप्रमाणे लॉ ट्रिब्युनल येथे प्रत्यक्ष जाऊन कामकाज पाहणे, कार्यपद्धती समजून घेणे तसेच तज्ज्ञांमार्फत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सामाजिक क्षेत्रात काम करणाºया वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड, यु.एन अशा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनाही विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. भारताचे नियत्रंक आणि महालेखापाल (उअॠ) या स्वायत्त संस्थेचे कामकाज, कार्यपद्धती आणि संरचना याबाबत विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.

टॅग्स :Courtन्यायालय