पर्यटकांना खुणावतोय पलूचा धबधबा
By Admin | Updated: July 27, 2015 03:08 IST2015-07-27T03:08:42+5:302015-07-27T03:08:42+5:30
: पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई आणि त्यात स्वच्छंदपणे वाहणारा पलूचा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. मुंबईपासून साधारण ७०

पर्यटकांना खुणावतोय पलूचा धबधबा
तलवाडा : पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई आणि त्यात स्वच्छंदपणे वाहणारा पलूचा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. मुंबईपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पिकनिक पॉइंटवर सध्या पर्यटकांची तुडुंब गर्दी दिसत आहे. आदिवासीबहुल या भागात यामुळे रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.
जून ते आॅक्टोबर या काळात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दगड व चिखलवाट तुडवतच येथे यावे लागते. येथील हिरवाईच्या सौंदर्यात विक्रमगडचा पलूचा आणि जव्हारचा दाभोसा धबधबा अधिक भर टाकतो. या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्याशिवाय येथील निसर्गदर्शन पूर्णच होत नाही. पावसाळा सुरू झाला की, येथील नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुभ्र धबधबे. विविध प्रजातींचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्याने पक्षी निरीक्षकसुद्धा या काळात येथे येत असतात. विक्रमगडमधील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी येथे आवर्जून भेट देत असतात. (वार्ताहर)