शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
4
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
5
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
6
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
7
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
8
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
9
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
10
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

कुडूसकरांची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

By admin | Published: April 16, 2017 4:21 AM

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे.

- वसंत भोईर,  वाडा

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे. मात्र, येथील तब्बल ५० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फक्त सहा पोलीस असल्याने कुडूसकरांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.तालुक्यातील बराच मोठा भूभाग डि.प्लस झोन म्हणून जाहीर झाल्यापासून यथे कारखान्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली आहे. परिणामी येथे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे देशभरातून अनेक बेरोजगार येथे रोजच्या रोज येत आहेत. त्यामुळे २२ गावे, ४० पाडे याचा अतंर्भाव असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यातच तालुक्यात कामानिमीत्त येणाऱ्यांच्या लोकसंख्येची नोंद नाही. झापाट्याने विकसीत होणाऱ्या परिसरात काही वर्षात लोक संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या प्रमाणात संबंधीत पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. कुडूससाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अनेक वर्षाची मागणी आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. कुडूस,चिंचघर, गुंज, उसर, मुसारणे, नारे, डाकिवली, चांबले, उचाट, डोंगस्ते, देवघर, बुधावली, काटी, कोंढले, म्हसवल, घोनसई मेट, वडवली, पैलंबार, सापरोंडे, मांगाठणे, वर्धा आदि ग्रामपंचायतींसह शेकडो कारखाने या पोलीस चौकीच्या कार्य क्षेत्रात येतात.कुडूस हे गाव भिवंडी व वाडा या दोन शहराच्या मधोमध असून तब्बल ५० गावची मुख्य बाजार पेठ आहे. भिवंडी येथे कापड उद्योग मोठा आहे. त्या अनुशंगाने येथे रोजच कामगारांची मोठी ये-जा असते. त्यातून गुन्हेगारी वाढली आहे. चोऱ्या, पाकिट मारी, रात्री अपरात्री लुटण्याचे प्रकार येथे अधुन मधुन होत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत कुडूसमधील रहिवाशांसाठी सध्या असलेले पोलिस बळ अत्यल्प आहे. वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे पोलिस ठाणे निर्मीतीची गरज आहे.- मेघना पाटील, सदस्य, पंचायत समीती, वाडायेथेनोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहेत. लोकांची संख्या वाढल्याने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढवणे आवश्यक आहे.- जितेश पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमान संघटनायेथे अनेक नवखे लोक बाजारहाट करण्यासाठी येतात. त्यातच गुन्हेगारीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनची अत्यंत गरज आहे.- अंजुमन सुसे, उपसरपंच, कुडूस