शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उधारी वसुलीसाठी अपहरण; बेदम मारहाण; बारवाल्याची गुंडगिरी, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:08 IST

खून करण्यासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बारच्या दोघा गुंडांना अटक केली आहे.

मीरा रोड : ऑर्केस्ट्रा बारमधील उधारीच्या वसुलीसाठी बारवाल्याने एका ग्राहकाचे अपहरण करून बारमध्ये आणले. बारच्या खोलीत ग्राहकास पट्टा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. पोलिसांनी खून करण्यासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करून बारच्या दोघा गुंडांना अटक केली आहे. 

मीरा रोड येथे नरेंद्र वीरेंद्र उपाध्याय (३४) हे राहतात. मॅडोना ऑर्केस्ट्रा बारमध्ये उपाध्याय यांची ५९ हजार रुपयांची उधारी आहे. बारमधील वाहिद मोईनुद्दीन खान (३६), गणेश भगवान पाटील (३३); कमलेश, मोसीन व अन्य ५ ते ६ जण हे उपाध्याय यांच्या राहत्या घराजवळ आले. त्यांना घराबाहेर बोलावले असता रिक्षात कोंबून बारमध्ये आणत मारहाण केली.

हत्या करण्यासाठी अपहरणाचा गुन्हामारहाणीत उपाध्याय हे जखमी झाले असून, त्यांच्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलिस ठाण्यात हत्या करण्यासाठी अपहरण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जानेवारीच्या सायंकाळी वाहिद व गणेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर बारचा मालक-चालक यांना पोलिसांनी आरोपी केले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून, वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर हे अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस