अपहरणकर्त्या शेजाऱ्याला अटक

By Admin | Updated: July 27, 2015 22:57 IST2015-07-27T22:57:47+5:302015-07-27T22:57:47+5:30

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका इसमास पोलिसांनी गजाआड केले.

The kidnapper is arrested in the neighborhood | अपहरणकर्त्या शेजाऱ्याला अटक

अपहरणकर्त्या शेजाऱ्याला अटक

वसई : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका इसमास पोलिसांनी गजाआड केले.
नालासोपारा, वाकण पाडा येथे राहणाऱ्या आदर्श चव्हाण हा घरातील पैसे घेऊन सायकल खरेदीसाठी शेजारी राहणाऱ्या शिवराम मौर्या यांच्याकडे गेला. शिवराम ने त्यास सायकल घेण्यासाठी विरार येथे नेले, व तेथे गेल्यानंतर त्याने आदर्शच्या आईला फोन करून आदर्शचे अपहरण झाले आहे, तो हवा असेल तर तीन लाख रुपये द्या असे धमकावले.
या घटनेने घाबरलेल्या आदर्शच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्वरीत हालचाल करून हे कॉल कुठून येतात याचा शोध घेतला . पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या सांगण्यावरून पैसे कचराकुंडीत ठेवण्यास सांगितले. कचराकुंडीत पैसे ठेवताच ते घेण्यासाठी आलेल्या मौर्या यास सापळा रचून अटक केली. आपल्या मुलाचे अपहरण शेजाऱ्यानीच केल्याचे पाहून आदर्शचे कुटुंबियाना मोठा धक्का बसला.

Web Title: The kidnapper is arrested in the neighborhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.