डहाणूत राष्ट्रवादीत खिंडार, मिहिर शाह आणि रविंद्र फाटक यांचा भाजपात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 04:15 IST2017-08-25T04:15:12+5:302017-08-25T04:15:14+5:30

शहरातील राष्टÑवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहिर शहा तसेच रविंद्र फाटक यांनी आपल्या पक्षातील सर्वच पदाचा राजीनामा देऊन बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईस्थित वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश केला आहे.

 Khandar, Mihir Shah and Ravindra Phatak are in the BJP in Dainat | डहाणूत राष्ट्रवादीत खिंडार, मिहिर शाह आणि रविंद्र फाटक यांचा भाजपात प्रवेश

डहाणूत राष्ट्रवादीत खिंडार, मिहिर शाह आणि रविंद्र फाटक यांचा भाजपात प्रवेश

डहाणू : शहरातील राष्टÑवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहिर शहा तसेच रविंद्र फाटक यांनी आपल्या पक्षातील सर्वच पदाचा राजीनामा देऊन बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईस्थित वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश केला आहे.
आगामी डिसेंबर (२०१७) मध्ये डहाणू नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाली असून नगराध्यक्षपदासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाल्याने आतापासूनच येथील सर्वच राजकीय पक्षात मोर्चे बांधणीला वेग आला आहे. डहाणूतील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मिहिर शाह तसेच रविंद्र फाटक यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.
दरम्यान, डहाणू नगरपरिषदेवर राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असून दोन वर्षापूर्वी मिहिर शहा हे नगराध्यक्ष होते. त्यांनी शासनाच्या आदिवासी, दलित वस्ती, पर्यटन विकास, अंतर्गत कोट्यावधीचा निधी आणून शहरात विकासाची कामे करून कायापालट केला होता. तर रविंद्र फाटक यांनी २००४ मध्ये शिवसेनेचे दहा नगरसेवकांना आणून पालिकेवर राष्टÑवादीची सत्ता आणली होता.

Web Title:  Khandar, Mihir Shah and Ravindra Phatak are in the BJP in Dainat