केळवे रेल्वेस्थानक दुर्लक्षितच

By Admin | Updated: January 30, 2017 01:31 IST2017-01-30T01:31:28+5:302017-01-30T01:31:28+5:30

पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे पर्यटनस्थळ असलेले व पर्यटक-प्रवाशांनी नेहमीच गर्दी असलेले केळवारोड रेल्वे स्थानक अतिशय दुर्लक्षित व असुविधांनी ग्रस्त आहे.

The Kelve railway station is notorious | केळवे रेल्वेस्थानक दुर्लक्षितच

केळवे रेल्वेस्थानक दुर्लक्षितच

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे पर्यटनस्थळ असलेले व पर्यटक-प्रवाशांनी नेहमीच गर्दी असलेले केळवारोड रेल्वे स्थानक अतिशय दुर्लक्षित व असुविधांनी ग्रस्त आहे. पर्यटकांकडून मोठे उत्पन्न मिळत असूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी व पर्यटकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.
केळवे हे विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी नेहमीच गजबजलेले असते. या स्टेशनला पर्यटनचा ही दर्जा प्राप्त
आहे परंतु गैरसोयीची यादी
इतकी लांबलचक होईल की कागदही अपुरा पडावा. स्थानक निर्माण होऊन बराच काळ लोटला, मात्र प्रवाशांना सुविधा देण्या बाबत प्रशासन ढीम्म आहे.
केळवे रोड स्थानकात पर्यटकांसाठी साधे वेटिंग रूम नाही, तिकीट काढण्यास पुरेशी व्यवस्था नाही, पावसाळ्यात पावसाचे पाणी गळक्या छपरातून प्रवाशांच्या
अंगावर पडत असते, लाईटचा डिपी बाँक्सही बसण्याच्या जागे शेजारीच आहे, शौचालायाची दुरावस्था आहे .

Web Title: The Kelve railway station is notorious