चाकात ओढणी अडकल्याने गेला जीव

By Admin | Updated: August 22, 2015 22:24 IST2015-08-22T22:24:53+5:302015-08-22T22:24:53+5:30

मोटारसायकलवरून जात असताना मागच्या चाकात गळ्यातील ओढणी अडकल्याने शनिवारी झालेल्या अपघातात आलेवाडी येथील प्रणाली आकाश धनू (२५) या महिलेचा दुर्दैवी

The junk got caught in the wheel | चाकात ओढणी अडकल्याने गेला जीव

चाकात ओढणी अडकल्याने गेला जीव

पालघर : मोटारसायकलवरून जात असताना मागच्या चाकात गळ्यातील ओढणी अडकल्याने शनिवारी झालेल्या अपघातात आलेवाडी येथील प्रणाली आकाश धनू (२५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्वत:चा जीव जात असताना तिने स्वत:च्या एक वर्षाच्या मुलीला मात्र या अपघातामधून वाचविण्यात यश मिळविले.
बोईसरजवळील आलेवाडी येथे राहणारे आकाश धनू हे आपली पत्नी प्रणाली व एक वर्षाची मुलगी यांना घेऊन आपल्या मोटारसायकलने नवापूरमार्गे दांडी येथे जात असताना नवापूरजवळ प्रणाली हिची ओढणी मोटारसायकलच्या मागच्या चाकामध्ये अडकल्याने तिचा फास गळ्याभोवती अडकून प्रणाली मोटारसायकलसोबत फरफटत गेली. यावेळी या अपघातात प्रणालीचा श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ओढणी चाकात अडकल्याने अचानक झालेल्या अपघातात फरफटत असताना तिने आपल्या मुलीला छातीशी कवटाळून तिला कुठलीही दुखापत होऊ दिली नसल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने स्वत: लोकमतशी बोलतांना सांगितले.
(वार्ताहर)

Web Title: The junk got caught in the wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.