जव्हारचा उपजिल्हा दर्जा परत मिळवणार - सुनील भुसारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:37 AM2020-01-21T00:37:49+5:302020-01-21T00:38:25+5:30

जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे.

Jawar to regain sub-district status - Sunil Bhusara | जव्हारचा उपजिल्हा दर्जा परत मिळवणार - सुनील भुसारा

जव्हारचा उपजिल्हा दर्जा परत मिळवणार - सुनील भुसारा

Next

जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे. आपल्या भागातील सर्व बांधवांची कामे जव्हारमध्येच व्हावीत, असा यामागचा उद्देश असून सरकार आपल्या दारात ही योजना नेमकी काय असते हे कृतीतून या भागातील लोकांना दाखवून देईन, असे प्रतिपादन विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केले. केव येथे आयोजित नवनिर्वाचित आमदार आणि जि.प. सदस्य यांच्या नागरी सत्कार प्रसंगी भुसारा बोलत होते.

खावटी कर्ज वाटप योजना, आरोग्याच्या विविध योजना लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या योजना आवश्यक आहेत, त्या सगळ्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही कटिबद्ध असून तशा योजनाही आम्ही आखल्या आहेत. याप्रसंगी या भागातील कुर्झे गटाचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य शिवा सांबरे, संदेश ढोणे, गणेश कासट, पं.स. सदस्य रुचिता कोरडा, दयानंद सुतार आणि केव
ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदार आणि जि.प. सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्र म केव ग्रामस्थांनी आयोजित केला होता.

अपेक्षाभंग होणार नाही

ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे वचन भुसारा यांनी दिले.
येत्या काळात आमदारांच्या सहकार्याने या भागातील विकासाची कामे करावयाची असल्याचे जि. प. सदस्य शिवा सांबरे यांनी सांगितले.

Web Title: Jawar to regain sub-district status - Sunil Bhusara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.