मुलानेच केली आईची गळा आवळून हत्या; फुलपाड्याच्या गांधी नगर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 07:35 PM2023-03-09T19:35:52+5:302023-03-09T19:37:12+5:30

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने आरोपी मुलाला अटक केली आहे. 

it was the son who strangled his mother incident in gandhi nagar area of phulpada virar | मुलानेच केली आईची गळा आवळून हत्या; फुलपाड्याच्या गांधी नगर परिसरातील घटना

मुलानेच केली आईची गळा आवळून हत्या; फुलपाड्याच्या गांधी नगर परिसरातील घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  नालासोपारा (मंगेश कराळे) : विरारमध्ये एका २६ वर्षीय पोटच्या मुलानेच आपल्या आईची ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत शवविच्छेदनसाठी पाठवून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने आरोपी मुलाला अटक केली आहे. 

विरारच्या फुलपाडा येथील गांधी नगर परिसरातील वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये वैशाली धनु (४४) ही मुलगा देवांश (२६) याच्यासोबत राहत होते. मंगळवारी रात्री मुलगा आणि आईमध्ये काही कारणावरून भांडण झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यानंतर गुरुवारी संतापलेल्या मद्यधुंद अवस्थेत मुलाने आपल्याच आईचा ओढणीने गळा दाबून हत्या केली आहे. या भांडणाची माहिती वैशालीने तिच्या आईला फोन करून अगोदरच दिली होती. तरी गुरुवारी दुपारी तिची आई घरी आली असता दाराला कुलूप लावून बेडरूममध्ये मृतदेह पडलेला दिसला. त्यानंतर मयत वैशालीच्या आईने तत्काळ ११२ नंबरवर कॉल करून संपर्क साधून ही माहिती दिली.  त्यानंतर विरार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले.

आई व मुलामध्ये भांडण झाले होते

मुंबईच्या माहीम येथे आई व मुलगा चार ते पाच दिवसांपूर्वी लग्नाला गेले होते. त्याठिकाणी मुलाने भांडण केल्याने नातेवाईकांनी पोलिसांना तक्रार केली होती. त्यावेळी आई व मुलामध्ये भांडण झाले होते. हाच राग काढून मुलाने ही हत्या केली आहे. आरोपी मुलाला गुन्हा दाखल करून अटक केले आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: it was the son who strangled his mother incident in gandhi nagar area of phulpada virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.