शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर पालिकेची कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:50 IST

मीरा रोड : नोंदणीकृत करारनामा करून मुद्रांक शुल्क भरलेले नसताना   मीरा-भाईंदर महापालिकेने अनेक विकासक, अधिकारपत्रधारकांना बांधकाम परवानग्या, टीडीआर ...

मीरा रोड : नोंदणीकृत करारनामा करून मुद्रांक शुल्क भरलेले नसताना  मीरा-भाईंदर महापालिकेने अनेक विकासक, अधिकारपत्रधारकांना बांधकाम परवानग्या, टीडीआर दिला आहे. याशिवाय अनेक विकसन करार, कार्यकंत्राट, भाडेपट्टाप्रकरणी मुद्रांक शुल्क भरले नसल्याप्रकरणी शासनाच्या आदेशाने नऊ शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत मीरा-भाईंदर महापालिकेची चौकशी सुरू केली आहे.    मीरा-भाईंदर महापालिकेचे काही अधिकारी, विकासक व राजकारणी आदींनी मिळून अनोंदणीकृत करारनामे वा कुलमुखत्यारपत्रद्वारे, तसेच मुद्रांक शुल्क न भरताच बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्याच पद्धतीने टीडीआर मोठ्या प्रमाणात दिले आहेत.   तपासणी पथक हे महापालिकेच्या कनकिया येथील नगररचना कार्यालयात तळ ठोकून आहे. 

पथकात हे नऊ जणतपासी पथकात १ नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, १ सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, १ सहायक नगररचनाकार व प्रत्येकी २ सहदुय्यम निबंधक वर्ग २, दुय्यम निबंधक श्रेणी १ आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.

-  भाडेपट्टा करारातसुद्धा शासनाचा महसूल बुडवला आहे. अशा प्रकारे शासनाचा करोडो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवतानाच अनोंदणीकृत करारनाम्याद्वारे बेकायदेशीर व बेनामी काळ्या पैशांचा व्यवहार केल्याचे आरोप व लेखी तक्रारी सजी आयपी, राजू गोयल, अमोल रकवी, अजय धोका, प्रदीप जंगम, कृष्णा गुप्ता आदींनी मुद्रांक निरीक्षक व शासनाकडे केल्या होत्या. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर