शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

दिवाळीनिमित्त पोह्यांना वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:32 AM

दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी  - दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.डहाणू येथील खादी ग्रामोद्योगात प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८१ साली फोर्ट येथे राहणारे दिवंगत रामचंद्र जोशी यांनी घराच्या आवारातच पोहा मिल सुरू केली. त्यांंचा हा वारसा मिथुन जोशी हा युवक चालवत आहे. येथे दगडी आणि पातळ पोहे बनविले जातात. याकरिता गुजरी जातीच्या भाताची आवश्यकता असते. दगडी पोह्यांकरिता हे भात गरम पाण्यात तीन तास भिजविण्यात येते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते भाजले जाते. त्यापासून थोडेसे गोलसर आकारातील आणि जाड पोहे मिळतात.या पोह्यांना चिवडा बनविण्यासाठी मुंबई बाजारात मोठी मागणी आहे. विशेषत: लालबागच्या प्रसिद्ध चिवडा गल्ली मध्ये मिळणारा विजयलक्ष्मी चिवडा, टेस्टी चिवडा आणि महालक्ष्मी चिवडा बनविण्यासाठी येथूनच निर्यात होते. तर पातळ (पेपर) पोह्यांसाठी भात थंड पाण्यात भिजवले जात असून वर उल्लेख केल्या प्रमाणेच प्रक्रि या केली जाते. त्यालाही चांगली मागणी आहे.गुजरी भातापासून हे पोहे केले जातात. पूर्वी डहाणू तालुक्यातील डोंगरीपट्ट्यातून स्थानिक आदिवासींकडून या जातीचे भात मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचे. मात्र हल्ली हायब्रीड बियाण्यांचा प्रभाव शेतकºयांवर जास्त आहे. तरीही चारोटीनजीकच्या उरसा गावातून काही प्रमाणात ही निकड भरून निघते. तर अधिकच्या भातासाठी गुजरातच्या नवसारी येथून आयात केली जाते. ते घाऊक बाजारात १३ ते १५ रु पये प्रतिकिलो दराने खरेदी केले जाते. तर तयार पोहे ३० ते ३५ रूपये किलोने विक्र ी केले जातात असे मिथून सांगतो.दरम्यान, भाताच्या दर्जानुसार त्यापासून किती पोहे मिळतात ते ठरते. असं असलं तरीही उत्तम दर्जाच्या शंभर किलो भातापासून ७० किलो दगडी पोहे, तर ५० किलो पातळ पोहे तयार होतात.उर्विरत ३० किलो कनी (बारीक तुकडे) आणि कोंड्याच्या स्वरूपात मिळतो. त्याचा वापर जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो. त्याला ६ ते ८ रु पये प्रतिकिलोने बाजारभाव मिळतो. तर भाताच्या आवरणापासून निघणारा तूस हा गिरणीची भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणला जातो.हक्काची बाजारपेठ हवी\गट शेतीच्या माध्यमातून गुजरी या भाताची लागवड करण्यास कृषी विभागाने शेतकर्यांना प्रवृत्त केले पाहिजे. शिवाय त्यांना हमी भाव देऊन, या भाताची खरेदी केली पाहिजे. तर पोह्यांपासून प्रक्रि या उद्योगाला चालना देण्यासाठी महिला वर्गाला प्रशिक्षण देणे आवश्यक असून बाजारपेठ मिळवून द्यायला हवी. याचा समावेश विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात केल्यास त्यांना पौष्टिक अन्न आण िदुष्काळ परिस्थितीत जनावरांना खाद्याची गरजही भागविता येईल.गुजरी भाताची कमतरता आणि सणवार वगळता वर्षभर हा व्यवसाय चालविणे अवघड आहे. त्यामुळे मोजक्याच पोहा मिल शेवटची घटका मोजत आहेत. याला नवसंजीवनीची गरज आहे.- मिथुन जोशी, डहाणू फोर्ट येथील अरु ण पोहा मिलचा मालक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDiwaliदिवाळी