शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मोकाट जनावरांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 1:15 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी ते तलासरी दरम्यान मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.

कासा: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी ते तलासरी दरम्यान मोकाट जनावरांचा वावर वाढला असून त्यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस दिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्ग प्रशासनासह आयआरबी कंपनी मात्र दुर्लक्ष करत आहे. मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा सहा पदरी असून सतत या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.सध्या उनळ्याचे दिवस असून गाव पाड्यातील गुरे ढोरे पाण्याच्या शोधात महामार्ग शेजारील शेतात आणि हिरवळ असलेल्या परिसरात फिरत असतात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी जुंपली जातात. मात्र चार महिन्यानंतर या जनावरांना मोकाट चरण्यासाठी सोडून देण्यात येत असल्याने ती जनावरे महामार्गावर आल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. याच व्यतिरिक्त महार्गावर दोन्ही बाजूच्या वाहिन्यांच्या मध्ये छोटी झाडे लावण्यात आलेली असल्याने हिरवळ पाहून मोकाट जनावरे रस्त्यावर येऊन चरताना अचानक वाहनांच्या समोर येऊन अपघात होतात. अशी मोकाट जनावरे काही ठिकाणी महार्गावर ठाण मांडून बसत असल्याने रात्री अपरात्री चालकाच्या लक्षात न आल्याने अपघात होतात तर कधी हॉर्न वाजवून ही उठत नाही. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन अनेक अपघातात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.दरम्यान ग्रामपंचायतीने लक्ष घालणे गरजेचे आहे. महामार्गावर मोकाट फिरणाºया जनावरांच्या डोळ्यावर रात्रीच्यावेळी वाहनांचा उजेड पडल्यामुळे अनेक अपघात घडले. जनावरांसह चालकही गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्याआहेत.स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोकाट जनावरामुळे अपघात घडत असल्यामुळे अनेकदा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा मोकाट महामार्ग लगतच्या ग्रामपंचायत प्रशासनाने व महार्गावर प्रशासनाने बंदोबस्त करणे आवश्यक आहे.कासा बाजारपेठेतही मोकाट जनावरांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कासा बाजारपेठ जवळ सायवन रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जनावरे येऊन रस्त्यावरच बसतात. त्यामुळे नागरीक व वाहनचालकांना मोठी अडचण होते.