शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

डिजेवर खर्च करण्यापेक्षा लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय उभारा - डॉ. राठोड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 4:30 PM

गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदिंना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गणेशोत्सव मंडळांसह लोकप्रतिनिधींना केले.

मीरारोड - गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदींना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गणेशोत्सव मंडळांसह लोकप्रतिनिधींना केले. सर्व पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील आरती व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लोकांशी संवाद साधा, अशी सूचना त्यांनी केली.गणेशोत्सावाच्या अनुषंगाने मॅक्सस मॉल सभागृहात पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. बहुतेकांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबद्दल संताप व्यक्त केला. तर पालिकेची एकखिडकी योजना असूनही मंडळांना वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाकडे फेऱ्या माराव्या लागतात, असे सांगितले.महापौर डिंपल मेहता यांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे आदेश आपण पालिकेला दिल्याचे सांगितले. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी खड्डे बुजवले जातील असे आश्वासन देतानाच विसजर्नावेळी खाद्य - पेयांच्या स्टॉलमुळे अस्वच्छता होऊ नये म्हणून सफाई कामगारांची नेमणूक करू असं सांगितले. सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपअधीक्षक शांताराम वळवी, उपमहापौर चंद्रकांत वैती, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, जगदिश शिंदे, बालाजी पांढरे, राम भालसिंग, वैभव शिंगारे, प्रविण साळुंके सह नगरसेवक, संस्थांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.गुलालमुळे कर्करोगसारखे आजार होत असल्याने फुलांच्या पाखळ्या वापरा. उंच मूर्ती टाळा, धार्मिक वाद होणार नाही याची काळजी घ्या. मूर्तीचे पावित्र्य ठेवा. सकारात्मक व सामाजिक बांधिलकीचे संदेश देखाव्यातून द्या असं मार्गदर्शन करतानाच नाहक वाद निर्माण होईल असं काही केल्यास तो एक दिवस तुमचा असेल पण नंतरचे सर्व दिवस आमचे असतील, अशी तंबीसुद्धा त्यांनी दिली. पोलीस कारवाई करतील आणि मग येणारे प्रत्येक सण पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात जातील. जुगार खेळाल तर धाडी टाकणार असं राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवexamपरीक्षा