फिरत्या वैद्यकीय पथकाचे उद्घाटन
By Admin | Updated: January 30, 2017 01:25 IST2017-01-30T01:25:58+5:302017-01-30T01:25:58+5:30
कल्याणी स्वयंसेवी संस्था व आनंद चंदावरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल खुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त फिरत्या वैद्यकीय

फिरत्या वैद्यकीय पथकाचे उद्घाटन
वाडा : कल्याणी स्वयंसेवी संस्था व आनंद चंदावरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल खुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त फिरत्या वैद्यकीय पथकाचा शुभारंभ गुरुवारी भारतीय वनबंधू परिषदेच्या सचिव प्रेरणा बागरी यांच्या हस्ते गारगाव येथे करण्यात आला.
पालघर जिल्हयातील काही दुर्गम खेडी यासाठी निवडण्यात आली आहेत. महिन्यातून एकदा हा दवाखाना त्यांना प्रारंभिक तपासण्या तसेच रक्त तपासणी, वैद्यकीय सल्ला मोफत देणार आहे. यामुळे काही दुर्लक्षित राहिलेले आजार गंभीररूप धारण करण्यापूवीॅ लक्षात येऊन त्यावर वेळेत उपचार होऊ शकतील. असे कल्याणी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ. वैभव ठाकरे यांनी सांगितले. या पथकामध्ये डॉक्टर, परिचारिका, रक्त तपासणी यंत्रणा व वैद्यकीय समाजसेवक असणार आहेत.
स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गणेश ठाकरे, डॉ. उज्ज्वला ठाकरे, अस्थिरोग तज्ञ जिगरवाला, विमल कोठारी आदी उपस्थित होते. नागरिकांनी मोठयÞा संख्येने या पथकाचा लाभ घेतला.
(वार्ताहर)