शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

"ई-फेरफार संगणक प्रणालीचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची तात्काळ बदली करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 14:30 IST

Vasai News : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा ,विक्रमगड , मोखाडा आणि वसई तालुक्यात हे निषेध आंदोलन जोरदार सुरु असून त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कामे खोळंबली आहेत.

आशिष राणे

वसई - डीएलआरएमपी' या डिजिटल प्रणालीचे राज्य समन्वयक तथा पुणे उप-जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी असंविधानिक भाषेचा वापर केल्याचा आरोप तलाठी संघटनांनी केला आहे. याचा राज्यासह वसई तालूका तलाठी संघ व मंडळ अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. दरम्यान मागील आठवड्यापासून राज्य तलाठी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सुरुवातीला काळया फिती नंतर धरणे आंदोलन नंतर सोमवारी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी वर्ग आपल्या डीएसी तहसीलदार यांना सुपूर्द करणार आणि याचीही दखल न घेतल्यास बुधवार पासून हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा संघटनेने दिला आहे.

परिणामी मंगळवारी तांत्रिक कामासाठी वापरल्या जाणााऱ्या 'डीएसी' वसईतील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी वर्गांनी वसई तहसीलदार उज्वला भगत यांच्याकडे जमा केल्या असून याखेरीज आम्ही केवळ नैसर्गिक आपत्तीची कामे सुरू ठेवणार आहोत अशी माहिती वसई तालुका तलाठी संघटनेच्या विद्यमान सचिव जानव्ही मोरे यांनी लोकमतला दिली.

पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा ,विक्रमगड , मोखाडा आणि वसई तालुक्यात हे निषेध आंदोलन जोरदार सुरु असून त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कामे खोळंबली आहेत. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी हे राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

तलाठी कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिलेल्या निवेदनावरुन उपजिल्हाधिकारी जगताप यांनी शासकीय सोशल ग्रूपवर चूकीची भाषा वापरली होती त्याचा तीव्र निषेध म्हणून हे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करा अशी ही मागणी तलाठी संघाने केली आहे. किंबहुना  ई पीक पाहणी एप मधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडी-अडचणी, तांत्रिक दोष काढून टाकावे, ई-फेरफार मध्ये येत असलेल्या काही तांत्रिक समस्याही तात्काळ दूर कराव्यात अशी मागणीही वसई तालुका मंडळ अधिकारी व तलाठी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार