शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

पर्यटनाला जबर फटका, रिसॉर्ट्सची प्रचंड हानी, अनेकांचा रोजगार बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 3:10 AM

अवघ्या तीन मिनिटाच्या चक्रीवादळाच्या तडाख्याने केळवे पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असलेली सुरुंची बाग एका क्षणात उध्वस्त करून टाकली. अनेक रिसॉर्ट व हॉटेल्सचे नुकसान झाल्याने इथला पर्यटन व्यवसाय संकटात सापडला आहे.

हितेंन नाईकपालघर : अवघ्या तीन मिनिटाच्या चक्रीवादळाच्या तडाख्याने केळवे पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असलेली सुरुंची बाग एका क्षणात उध्वस्त करून टाकली. अनेक रिसॉर्ट व हॉटेल्सचे नुकसान झाल्याने इथला पर्यटन व्यवसाय संकटात सापडला आहे. याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री येणार होते. परंतु त्यांनी अचानक पाठ फिरवल्याने केळवे वासीयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.शांत, सुंदर समुद्र किनारा, जागृत शितलाई देवीचे स्थान, बागायती क्षेत्राबरोबरच किनाºयावर लांबच लांब पसरलेली सुरुंची बाग नेहमीच पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने दिवसेंदिवस मुंबई, नाशिक, गुजरात राज्यातील पर्यटकांची मोठी पसंती ह्या भागाला मिळत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह, शासन पातळीवरून या भागात पर्यटकांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीद्वारे विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. परंतु मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास समुद्रातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाने अवघ्या तीन मिनिटांचा सुरुंच्या बागेत घातलेल्या हैदोसाने सुमारे ८०० ते १००० झाडे उन्मळून पूर्ण बागच उध्वस्त करून टाकली आहे. या वादळाची झळ काही हॉटेल व्यावसायिकांना बसून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र केळव्याची शान आणि पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेली निसर्गरम्य सुरुची बागच उध्वस्त झाल्याने पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिकांनी एकजुटीचे दर्शन घडवीत या बागेतील सर्व झाडे एकाबाजूला करीत साफसफाई मोहीम हाती घेतली आहे.अशावेळी आपले पालकमंत्री विष्णू सवरा हे सकाळी ३ किमी अंतरावर आले असतांना आमच्या वेदनावर फुंकर घालण्यासाठी ते येथेही येतील. या आशेने त्यांची वाट पाहत असलेल्या केळवेवासियांची घोर निराशा ते न आल्याने झाली. ते आल्यानंतर प्रशासन वेगाने कार्यरत होऊन वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून किनाºयावरील उध्वस्त झालेल्या बागेत नव्याने झाडांची लागवड करण्याच्या, नादुरु स्त झालेल्या सोयीसुविधांच्या डागडुजी तसेच किनाºयावर टेट्रोपोलच्या अपूर्ण बंधाºयाचे कामे पूर्ण करण्याचे आदेश देतील, अशी माफक अपेक्षा केळवेवासिय व्यक्त करीत असताना ते हाकेच्या अंतरावर येऊन परत माघारी फिरल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.>निवडणूकीवर डोळाकेळवे येथेही अनेक घरांचे नुकसान झाले असतांना पालकमंत्र्यांनी गुरुवारी फक्त शिरगावच्या बाधितांना आर्थिक मदत दिली. येथे पुढच्या काही महिन्यात होणाºया निवडणूकीला डोळ्यासमोर ठेवूनच केळव्याच्या बाधिताकडे पाठ फिरवून शिरगावमध्ये तात्काळ मदतकार्य दिल्याचा आरोप केला जात आहे.पालकमंत्री आमच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी येणार असल्याचे सकाळी निरोप आल्यानंतर त्याच्या वाटेकडे आम्ही डोळे लावून बसलो होतो. मात्र सरपंचासह लोकांना चार तास वाट पहायला लावल्या नंतर ते येणार नसल्याचे कळले, असे केळव्याचे उपसरपंच तुषार पाटील यांनी सांगितले.>वसईत वादळाचा रिसॉर्टचालकांना फटकापारोळ : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन झालेल्या वादळी पावसात अर्नाळासमुद्र किनाºया वरील रिसॉर्टचे . छप्परे उडून गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या परिसरातील भूमीपुत्रांनी शेतीची कास सोडून पर्याटकांची पसंती असल्यामुळे त्यांनी रिसॉर्ट व्यवसायात पदार्पण केले होते या मुळे या भागात रोजगाराची संधी निर्माण झाली. पण वाढती मजूरी, महाग वीज, मंदावणारी पर्याटकांची संख्या अशा परिस्थितीत रिसॉर्ट मालक हा व्यवसाय चालवत असतांना या वर्षी वादळाने रिसॉर्ट चालकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यासाठी पैसा पुन्हा उभा कसा करायचा हा प्रश्न त्यांना सतावित आहे.>मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांचे साहाय्यबोईसर : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टिमध्ये बोईसर पूर्वेकडील लोखंडी पाडयातील पुलावरून वाहणाºया पाण्यात वाहून मृत्यू पावलेल्या रबीउल्ला शाह या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना चार लाखांचा धनादेश जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी पालघरचे तहसीलदार महेश सागर, भाजपा बोईसर मंडळाचे अध्यक्ष महावीर जैन, पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, जि. प. सदस्या रंजना संखे, पंचायत समिती चे सदस्य जितेंद्र संखे आदि उपस्थित होते.>वाडा तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसानवाडा : अनेक ठिकाणी हलवार जातीची भातपिके तयार झाल्याने शेतकºयांनी त्याची कापणी केली होती. त्यातील दाण्यांना आता मोड येऊ लागले असल्याने ते पूर्णपणे खराब झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी या पावसाने भातपिके आडवी केली आहेत तर अनेक ठिकाणी ती पाण्याखाली गेल्याने भाताचे उत्पन्न ४० ते ५० टक्के कमी होणार आहे.-नितिन पष्टे शेतकरी, गातेस परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तयार कापलेले भात पावसाने भिजवले आहे तर जे पीक तयार होण्याच्या मार्गावर होते ते पाण्याखाली गेले आहे किंवा आडवे झाले आहे. त्यामुळे या पावसाने तालुक्यातील भातशेतीचे जवळपास निम्म्याने उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहोत, त्यामुळे पंचनामे तातडीने व्हायला हवेत.निसर्गाच्या लहरीपणाचा हा आणखी एक फटका शेतकºयांना बसला आहे. कधी पाऊस येत नाही तर कधी वेळेवर येत नाही. यावेळी सगळे आलबेल होते. शेतकरी खुषीत होता. तर या परतीच्या पावसाने त्याला जोरदार फटका दिला म्हणजे काहीही झाले तरी नुकसान शेतकºयाच्या पाचवीला पुजलेले असते, याचा प्रत्यय यावर्षीही शेतकºयांना आला.>या आपत्तीने रिसॉर्ट व्यवसायाचे मोठे नुकसान केले असून ५० लाखांचा फटका या मालकांना बसला आहे. बँकचे कर्ज काढून या व्यवसायाची उभारणी केल्याने या आपत्तीग्रस्त मालकांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी-महादेव निजाई, रिसॉर्ट संघटना, वसई