'वसई -वन' टॉवरच्या ८ मजल्यावर भीषण आग; जीवितहानी नाही, इमारतीतील ५० रहिवाशांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 06:21 PM2021-11-05T18:21:59+5:302021-11-05T18:23:10+5:30

वसईच्या अंबाडी रोड पुलाशेजारी उभी आहे ही १२ मजली टोलेजंग इमारत

A huge fire broke out on the 8th floor of Vasai-One tower | 'वसई -वन' टॉवरच्या ८ मजल्यावर भीषण आग; जीवितहानी नाही, इमारतीतील ५० रहिवाशांची सुटका

'वसई -वन' टॉवरच्या ८ मजल्यावर भीषण आग; जीवितहानी नाही, इमारतीतील ५० रहिवाशांची सुटका

googlenewsNext

- आशिष राणे

वसई: वसई पश्चिमेला अंबाडी रोड ब्रिज शेजारी उभ्या वसई वन या १२ मजली टोलेजंग इमारतीच्या ८ मजल्यावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना एन दिवाळीत घडली आहे. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सोसायटी व एका सदनिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे या आगीच्या धुराचे लोण १२ व्या मजल्यावर पोहचल्याचे आढळून आल्यावर या दुर्घटनेवेळी इमारतीच्या वरील सर्व  मजल्यावर अडकून बसलेल्या त्या सर्व ५० हुन अधिक रहिवाशांची वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणिकपूर पोलीस ठाणे तथा नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत अंबाडी रोड स्थित वसई वन नामक  या १२ मजली टोलेजंग इमारतीच्या ८ मजल्यावर दि 5 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी अचानक स्टेरकेसच्या पेसेज मध्ये शॉर्टसर्किट झाले व बघता बघता ही आग समोरील एका सदनिकेत शिरून संपुर्ण सदनिकाच यात जळून खाक झाली ही आग व आगीचे लोण इतके भीषण होते की तिचा धूर थेट १२ व्या मजल्यावर पोचला मात्र या घटनेची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला देताच वसई विरार अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम आगीवर नियंत्रण आणताना सोबत अन्य ५० हुन अधिक रहिवाशांची सुखरुप सुटका केली.या सर्वांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान इमारतीच्या पेसेज मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे येथील रहिवासी तथा  माजी अग्निशमन समन्वयक  भरत गुप्ता यांनी माध्यमाना सांगितले. या घटनेत ८ मजल्यावर असलेल्या एका सदनिकेचे मोठे नुकसान झाले असून यात ९ व्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका जेष्ठ महिलेला  ही तात्काळ हलविण्यात आले आहे. परिणामी टोलेजंग इमारतीच्या टॉवर ला दिवसाढवळ्या आग लागते व अग्निशमन दलाच्या जवानांनी यासर्वाना सुखरूप सुरक्षित स्थळी आणण्यात यशस्वी ही झाले असले तरी इतक्या उच्चभ्रू वसाहत म्हणून व टेक्नॉलॉजी ने विकसित टॉवरला आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्यप कळु शकलं नाही परंतु या टॉवर व त्याच्या संबंधित कागदपत्रे व फायर परवानगी ची आयुक्तांकडून चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे.
 

Web Title: A huge fire broke out on the 8th floor of Vasai-One tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.