शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

वाड्यामध्ये वाढीव वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:44 PM

महावितरणसमोर भाजपची निदर्शने ; बिले रद्द करण्याची मागणी

वाडा : कोरोनाच्या काळात वीज वितरणच्या कर्मचा-यांनीही वीजमीटरचे रीडिंग न घेतल्याने लॉकडाऊननंतर महावितरणकडून भरमसाट वाढीची बिले देण्यात आली आहेत. ही बिले गोरगरिबांच्या आवाक्याबाहेरची असल्याने वाढीव वीजबिले रद्द करावीत, या मागणीसाठी भाजप वाडा शाखेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून बिलांची होळी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्च ते जूनदरम्यान देशभरात लॉकडाऊन होते. सर्व काही बंद होते. या काळात वीजबिलांचे रीडिंग घेतलेले नाही. परिणामी, जुलै-ऑगस्ट महिन्यांंत गोरगरीब आदिवासी बांधवांना एकाच वेळी वाढीव बिले आली. आधीच रोजगार नसल्याने उपासमारीचे संकट असलेल्यांवर वाढीव वीजबिलांचा भार आला. याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने भाजपच्या वतीने निदर्शने करून वीजबिलांची होळी केली.वीजबिले सरकारने कमी केली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. या आंदोलनात भाजपचे तालुका सरचिटणीस राजू रिकामे, जिल्हा नेते मनीष देहेरकर, राजू दळवी, कुणाल साळवी, शुभांगी उत्तेकर, महिला तालुकाध्यक्ष अंकिता दुबेले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBJPभाजपा