शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
4
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
5
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
6
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
7
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
8
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
9
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
10
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
11
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
12
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
13
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
14
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
15
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
16
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
17
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
18
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
19
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
20
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

उद्योजकांनी केली वीज बिलांची होळी; महावितरणला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:22 PM

सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मान्य न झाल्यास वीज बिले न भरण्याचा इशारा दिला आहे.

बोईसर : सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मान्य न झाल्यास वीज बिले न भरण्याचा इशारा दिला आहे.तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) चे अध्यक्ष डि. के. राऊत यांचे नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता टीमाच्या कार्यालयपासून एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून वीज बिलांची होळी करून उपकार्यकारी अभियंता मदन राठोड यांना निवेदन दिले. यावेळी टीमाचे पदाधिकारी वेलची गोगरी, पापा ठाकूर, जगन्नाथ भंडारी, एस. आर. गुप्ता, रवी भावसार, शिरीष नाडकर्णी , पूनम कटारिया यांच्यासह उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होतेआयोगाच्या नोव्हेंबर २०१६च्या आदेशानुसार आॅगस्ट २०१८ पर्यंत असलेले वीजदर पुढे मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. सप्टेंबर २०१८ मधील दरवाढ व पॉवर फॅक्टर पेनल्टी पूर्णपणे रद्द करण्यात यावी. दर स्थिर ठेवण्यासाठी मागील सरकारने जानेवारी २०१४ पासून दरमहा ६०० कोटी रु. प्रमाणे दहा महिन्यासाठी ६०००/- कोटी रु. अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे आताच्या सरकारने औद्योगिक वीजदर स्थिर ठेवण्यासाठी सप्टेंबर २०१८ ते २०२० या १९ महिन्यासाठी ३४००/- कोटी रु .अनुदान द्यावे. शेजारील सर्व राज्यांच्या समपातळीवर येईपर्यंत वीजदर स्थिर ठेवण्यात यावेत या मुख्य मागण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले.राज्यातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही दिनांक १२ सप्टेंबर २०१८ च्या निकालाद्वारे पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १६५० उद्योग व यंत्रमाग या वीज ग्राहकांना सर्वांनाच दरवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे . १ सप्टेंबर २०१८ पासून प्रत्यक्ष लागू झालेली दरवाढही कमी नाही तर एप्रिल २०१८ मध्ये साधारणत: २ टक्के वाढ लागू आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१८ मधील वाढ अल्प म्हणजे 3 ते ४ टक्के आहे.सव्वाशे कोटींचा महसूलतारापूर एमआयडीसीमध्ये एस टीचे ४६० , एल टी चे ११८०, ई एचव्हीचे ७ असे मिळून एकूण १६४७ वीज ग्राहक असून एस. टी. चे वीज ग्राहक ७० ते ७५ , एल. टी चे १२ ते १३ तर , ई एच व्ही चे ६० असे मिळून सुमारे १५० मिलियम युनिट (एम.यु. ) (१० लाख युनिट म्हणजे १ एम. यु.) वीज वापरत असून महिना काठी फक्त तारापूर एमआयडीसी मधून सुमारे १२५ करोड रुपयांचा महसूल महावितरणला मिळत आहे

टॅग्स :mahavitaranमहावितरण