शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:31 AM

डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.

- शशिकांत ठाकूरकासा  - डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.कासा भागात पावसाअभावी भात पेरण्या खोळंबल्या होत्या तर सायवन भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी सुरु वातीला पेरण्या केल्या त्याचे पीक पावसाअभावी करपू लागले होते. काही शेतकऱ्यांनी मोटारने, इंजिनने पाणी देऊन ती वाचविली. परंतु जेथे हे शक्य नव्हते तेथील बियाणे पाण्याअभावी न रुजल्याने वाया गेली. मात्र शुक्र वारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कासा भागातील शेतीत मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पाणी साचलेले होते. त्यामुळे शेतीच्या कामाना आता वेग येणार असून रखडलेली भात शेतीची पेरणी व नांगरणीची कामे सुरू होणार आहेत. कारण गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी पावसाची वाट पाहात होते. उशिरा पावसामुळे यंदा पेरणी बरोबरच रोपणीची कामेही लांबणीवर जाणार आहेत. तर यापुढेही पाऊस असाच सुरू राहिला तर भाताचे पीक चांगले येईल.कुडूसची बाजारपेठ जलमयवाडा : गेले अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र गुरूवारपासून पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारपेठेत सर्वत्र पाणी तुंबल्याने कुडूस गाव पाण्यात गेले आहे. पावसाअगोदर गटारीची साफसफाई न केल्याने पाणी तुंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वाडा तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कोरड भात पेरणीची कामे केली होती. मात्र त्यानंतर आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. आता कालपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शेतकºयांनी भात, नाचणी, वरई यांची कोरड पेरणीची कामे निम्म्याहून अधिक पूर्ण केली होती. कोरड पेरण्या झाल्यानंतर आठ दहा दिवस पाऊस गायब झाला होता. तो कालपासून संततधार बरसतो आहे. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार