शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचे मुख्यालय सिडको बांधणार?

By admin | Updated: June 29, 2015 04:28 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले आहे.

हितेन नाईक, पालघरपालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले असले तरी निधीची चणचण असल्याने सर्व कार्यालये उभारण्याची जबाबदारी सिडकोकडे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दर्शविल्याचे विश्वसनीय सूत्राकडून कळते.विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा कार्यालयासाठी कोळगावच्या दुग्धविकास विभागाची जागा शासन स्तरावरून सुचविण्यात आली. पाणी, जागा, रेल्वे, बस, वैद्यकीय शैक्षणिक सोयीची उपलब्धता या निकषामध्ये पालघरची बाजू उजवी ठरल्याने तसेच कोळगाव व मोरे कुरण या भागात दुग्धविकास विभागाची सुमारे ४४० हेक्टर जमीन उपलब्ध असल्याने आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची घोषणा केली होती. दुग्धविभागाच्या ४४० हेक्टर जमिनींपैकी १४० हेक्टर जमीन जिल्हा कार्यालय उभारणीसाठी देवून उर्वरित जमीन सिडकोला द्यायची व त्या मोबदल्यात सिडको जिल्हा कार्यालयाची उभारणी करून देणार आहे आणि उर्वरित ३०० हेक्टर जमीनीवर गृहनिर्माण, वाणिज्यीक प्रकल्प आदिंची उभारणी करणार असल्याचा प्रस्ताव शासन स्तरावरून करण्यात आला होता.शासनाकडे निधीची चणचण असल्याने जिल्हानिर्मितीनंतरही १० महिन्याचा कालावधी उलटूनही जिल्हा कार्यालये मिळेल त्या जागेत उभारण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्याची प्रशासकीय गाडी रुळावर येण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शासनाने आपल्याकडील उपलब्ध जागेचा विनीयोग अत्यंत खुबीने करण्याचे ठरविले असून आपल्याजवळील ३०० हेक्टर जमीन सिडकोला १४० हेक्टर जमिनीवर प्रशस्त व आदर्श असे जिल्हा प्रशासकीय संकुल उभे करून द्यावयाचे या निर्णयाप्रत शासन आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.सर्वसामान्यांना मात्र आनंद४पालघर जिल्हा प्रशासकीय कार्यालय संकुल सिडकोने उभे करून देण्याच्या मोबदल्यात सिडकोला पालघर येथील जमीन विकसित करण्यास देण्यासाठी शासनाचा प्रस्तावामुळे सिडकोचा शिरकाव या परिसरात होणार असून तिचा गृहप्रकल्प साकारल्यास सहाजिकच घरांच्या व जमिनीच्या किंमती मोठ्या प्रमाणावर खाली येणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. पालघर व परिसरात कमीत कमी २० ते २५ हजार फ्लॅटस विक्रीसाठी उपलब्ध असून विक्रीचे मार्केट डाऊन असल्याने खाजगी बिल्डर्सना याचा मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय तसेच उच्च वर्गाने फ्लॅटच्या किंमती खाली येणार असल्याच्या शक्यतेचे स्वागत केले आहे. उतरलेल्या दराचा फायदा सर्वसामान्यांंना होणार असल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.