शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पाटील यांची ४३ वी 'आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण; कौस्तुभ राडकरांच्या विक्रमाशी केली बरोबरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 05:16 IST

२०२६ सालाच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठून हार्दिक पाटील आता भारताचे सर्वाधिक आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

मंगेश कराळेलोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा :- क्रीडा विश्वातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या 'आयर्नमॅन' (Ironman) स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण करणारे विरारचे सुपुत्र हार्दिक दयानंद पाटील यांनी जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. नुकत्याच न्यूझीलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवत हार्दिक पाटील यांनी आपल्या कारकिर्दीतील ४३ वी 'फुल आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीसह त्यांनी भारताचे नामांकित ट्रायथलीट कौस्तुभ राडकर यांच्या ४३ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याच्या भारतीय विक्रमाची बरोबरी केली आहे. २०२६ सालाच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठून हार्दिक पाटील आता भारताचे सर्वाधिक आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

या ऐतिहासिक क्षणी आपली भावना व्यक्त करताना हार्दिक पाटील म्हणाले, न्यूझीलंडमधील ४३ वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणे हा माझ्यासाठी केवळ एक विक्रम नसून, भारताला या खेळात जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.कौस्तुभ राडकर सरांच्या विक्रमापर्यंत पोहोचणे हा सन्मान आहे, पण माझे ध्येय याही पुढे आहे. या वर्षी मी जास्तीत जास्त स्पर्धा पूर्ण करून भारताचे नेतृत्व संपूर्ण जगात अधिक प्रकर्षाने सिद्ध करणार आहे. विरारच्या मातीने मला जी जिद्द दिली, तीच मला जागतिक स्तरावर लढण्याचे बळ देते.

हार्दिक पाटील यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या आगामी स्पर्धांकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. हार्दिक पाटील यांच्या या यशाने केवळ विरारच नव्हे तर संपूर्ण भारताची मान जागतिक क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे.

१) ऐतिहासिक बरोबरी :- कौस्तुभ राडकर यांच्यानंतर ४३ पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे हार्दिक पाटील हे दुसरे भारतीय खेळाडू ठरले आहेत.२) न्यूझीलंडमधील यश :- अत्यंत आव्हानात्मक वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीत न्यूझीलंड येथील स्पर्धा पूर्ण करून त्यांनी आपली जिद्द सिद्ध केली.३) पुढील ध्येय :- या वर्षात आणखी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे.४) देशाचे नेतृत्व :- केवळ स्पर्धा पूर्ण करणेच नव्हे, तर 'आयर्नमॅन'च्या माध्यमातून जागतिक पटलावर भारताचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मानस आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Patil equals record with 43rd Ironman finish in New Zealand!

Web Summary : Virar's Hardik Patil completed his 43rd Ironman, matching the Indian record held by Kaustubh Radkar. Patil aims to surpass this milestone and elevate India's position in Ironman competitions globally. He dedicated his win to India.
टॅग्स :Mumbaiमुंबई