शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

दिवाळीचा आनंद मावळताच ‘ते’ रोजगाराच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:25 AM

स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी, वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसो दूरच आहे.

मोखाडा : स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी, वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसो दूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षनुवर्षे स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहे.दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कोणतीही यंत्रणा येथे उपलब्ध नाही, तसेच केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाही.तालुक्यातील बिवलपाडा, रुईपाडा, फनसपाडा, कुर्लोद, सावर्डे, कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया म्हणजे काय रे भाऊ असाच काहीसा सवाल येथील आदिवासी करत आहेत. तर शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लपंडाव असून त्यातच सततचे भारनियमन व वाढीव बील आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रुग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत असून यामुळे बोगस डॉक्टरांना पेव फुटले असून सगळ्या सोईयुक्त दवाखाना अद्यापही मोखाडयात झालेला नाही यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक, मुबंई, ठाण्याकडे धाव घ्यावी लागते.