हातणेचा मुंगूर मत्स्य प्रकल्प अखेर बंद

By Admin | Updated: February 1, 2017 02:56 IST2017-02-01T02:56:27+5:302017-02-01T02:56:27+5:30

हातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारा व देहर्जा नदीला प्रदूषित करणारा मुंगूर मत्स्य प्रकल्प बंद करण्याचे व त्यातील मत्स्यसाठा नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Handicap fishery project is finally closed | हातणेचा मुंगूर मत्स्य प्रकल्प अखेर बंद

हातणेचा मुंगूर मत्स्य प्रकल्प अखेर बंद

- राहुल वाडेकर,  विक्र मगड
हातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारा व देहर्जा नदीला प्रदूषित करणारा मुंगूर मत्स्य प्रकल्प बंद करण्याचे व त्यातील मत्स्यसाठा नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आमीन फार्म प्रा. लि. च्या सात तलावामध्ये मुंगुर मशांचे पालन व उत्पादन घेतले जात होते. त्यातील माशांना खाद्य म्हणून कोंबडीची सडलेली आतडी, कुजलेले मांस टाकले जात असल्यामुळे गावामध्ये तसेच आजूबाजूलला दुर्गंधी पसरत होती. हे दूषित पाणी सोडले जात असल्याने देहर्जा नदी दूषित होत होती. त्यामुळे आजू-बाजूच्या गावामध्ये रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या तलावांमधील दूषित पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली होती. याबाबचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्याने हा आदेश जारी झाला आहे.
या बाबत ग्रामपंचायतीने या फार्मच्या मालकाला नोटिस बजावूनही तिच्याकडे दुर्लक्ष करून उत्पादन सुरूच ठेवले. याबाबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी सरकारी पातळीवर निवेदन व पाठपुरावा केला. त्यानंतर आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासाहित चौकशी करून त्याबाबतच्या अहवालात या मस्त्य प्रकल्पाने आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा ठपका ठेवला होता. या बाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त व तहसीलदार यांनी चौकशीचे आदेश दिले. मंगूर हे मांसाहारी असल्याने भारतीय मासळीच्या प्रजाती नामशेष होणार असल्याने मुंगूरचे संवर्धन, पणन यास प्रतिबंध करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार हा प्रकल्प त्वरित बंद करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पालघर (ठाणे) यांनी दिले आहेत. जर हा प्रकल्प बंद न केल्यास कायदेशीर कार्रवाई केली जाईल असा उल्लेख या अहवालात केला आहे.

मुंगूर माशाच्या प्रकल्पातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हे पाणी देहर्जा नदीच्या पात्रात सोडले जायचे त्यामुळे नदीही दूषित व्हायची. हा प्रकल्प बंद व्हावा म्हणून आम्ही शासनाकडे ग्रामपंचायतस्तरावरून वेळो-वेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र याबाबत शासनाकडून कुठली ही कारवाई केली जात नव्हती. अखेर हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश आज आले आहेत.
-नंदीनी डोले, सरपंच, देहर्जा, हातणे ग्रामपंचायात

गावात माशांचे, डासांचे प्रमाण वाढले होते. या बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणेने चौकशी केली व या प्रकल्प बंद केला हे उत्तम झाले. -नितिन डोले, ग्रामस्थ, हातने गाव

Web Title: Handicap fishery project is finally closed