ग्रा.पं. कर्मचारी जाणार जि.प.त

By Admin | Updated: February 8, 2017 03:53 IST2017-02-08T03:53:40+5:302017-02-08T03:53:40+5:30

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने उभारलेल्या

G.P. Employees going to ZP | ग्रा.पं. कर्मचारी जाणार जि.प.त

ग्रा.पं. कर्मचारी जाणार जि.प.त

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने उभारलेल्या आंदोलनाला ्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच कर्मचाऱ्यांना शिक्षण पात्रते नुसार सरळ सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळसेवेने १० टक्के नोकरभरतीत सामावून घेणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक भरणे, भविष्य निर्वाह निधी भरणा करणे, अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केले होते.
तसेच १३ जुलै २०१६ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चाही नेला होता. मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आल्या नंतर सन २०१३ साला पासून नोकर भरती बंद असल्यामुळे तत्काळ भरती करता येत नसली तरी मी लवकरात लवकर प्रयत्न करून कर्मचारी यांना जिल्हा परिषद येथे सामावून घेण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याची पूर्तता यामुळे होणार असून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: G.P. Employees going to ZP