शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
2
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
4
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
5
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
6
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
7
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
9
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
10
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
11
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
12
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
13
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
14
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
15
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
16
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
17
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
18
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
19
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
20
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:23 IST

गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.

- आशिष राणेवसई : दहीहंडी आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. हा दहीहंडी उत्सव आणि त्यातील जोखीम तसेच जीवाचा धोका विचारात घेऊन त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी वसई - विरार महापालिकेने गोविंदांना मोफत विमा देण्याचे यंदा ठरवले आहे. परंतु पालिकेने याबाबत आवाहन केल्यानंतर बुधवार २१ आॅगस्टपर्यंत एकूण ३२ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा थोडा कमी आहे. दरम्यान, शेवटच्या तारखेनंतरही आपण नोंदणी करून घेतो. त्यामुळे यंदाही ही संख्या नक्कीच वाढेल, अशी माहिती पालिकेच्या क्रीडा विभागाचे दिगंबर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. उंचावरील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. ही चढाओढ आणि हा थरार शनिवारी वसई-विरारमध्ये अनुभवता येणार आहे.उंचावरील हंड्या फोडताना गोविंदांना होणारे अपघात पाहता यंदाही गोविंदा पथकांसाठी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने खास विमा योजनेस मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने वसई-विरारमधील गोविंदा पथकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.या योजनेचे स्वरूप काय आहेवसई-विरार महापालिकेतर्फे शहरातील नोंदणीकृत गोविंदा पथकांचा विमा नोंद केला जात आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख, तर दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रु पये, तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख या विम्यातून देण्यात येणार आहेत.अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा एक लाखांपर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नोंदणीकृत ४ हजार ८१९ गोविंदांनी विम्याची नोंद केली होती.परंतु यावर्षी २१आॅगस्टपर्यंत फक्त ३ हजार २०० गोविंदांच्या विम्याची नोंद झाल्याने ही आकडेवारी सध्या तरी अत्यल्प प्रतिसाद दर्शविते. त्यामुळे त्वरा करा शहरातील गोविंदांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा पालिकेच्या वतीने केले आहे.हा आकडा अत्यल्प वगैरे नाही अद्यापही दोन दिवस आहेत, अगदी सण उद्यावर आला आहे, तरी पालिका नोंदणी घेते. प्रत्यक्षात जे प्रोफेशनल गोविंदा आहेत ते गुरूपौर्णिमेपासून सराव सुरू करतात. अशा शेकड्यांनी नोंदणी आपल्याकडे वेळीच येतात. मात्र ज्यांना माहीत अथवा कल्पना नसते ते अखेरीस येतात.- दिगंबर पाटील, क्र ीडा विभाग, पालिका मुख्यालय, विरार

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी