वनहक्क चळवळीसाठी वयम् चळवळीने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:16 IST2020-02-01T23:14:12+5:302020-02-01T23:16:51+5:30
वन विभागाने वनहक्क जमीन कसणाऱ्या कुटुंबांना प्लॉट दिले आहेत.

वनहक्क चळवळीसाठी वयम् चळवळीने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट
जव्हार : जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील बहुतांश आदिवासी कुटुंबे वनहक्क प्लॉटवर अवलंबून आहेत. मात्र वन विभागाने या वनहक्क जमीन कसणाऱ्या व वनहक्क दावेदारांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. काही प्लॉटधारकांची शेतावरील घरे मोडून टाकली आहेत. याविरोधात प्लॉटधारकांचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून वनहक्क वयंम चळवळीने राज्यपालांची भेट घेतली.
वन विभागाने वनहक्क जमीन कसणाºया कुटुंबांना प्लॉट दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंबे त्या वनहक्क जमिनीवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र आता वन विभागानेच या कुटुंबीयांसमोर अडचणी आणल्या आहेत, असे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वन विभागाची अरेरावी थांबावी, आदिवासी वन प्लॉटधारकांचे रक्षण व्हावे, या गंभीर प्रश्नाची राज्यपालांनी दखल घ्यावी, ते भूमिहीन होऊ नयेत, म्हणून वयंम चळवळीने आदिवासीच्या जमिनीसाठी चळवळ केली असून, वयंम चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर व विश्वस्त मिलिंद थत्ते यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वनप्लॉटधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपाल कोश्यारी हे विक्रमगड तालुक्यातील वयंम चळवळीच्या गावात येऊन वनप्लॉटधारक शेतकऱ्यांना भेट देणार असल्याचे वयम् चळवळीने सांगितले.