हे सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे; जिल्ह्यात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:16 AM2020-02-26T00:16:30+5:302020-02-26T00:16:44+5:30

सरसकट कर्जमाफीसह अन्य आश्वासने न पाळल्याची टीका; ठिकठिकाणी दिली निवेदने

This government is a traitor to farmers; BJP's Elgar in the district | हे सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे; जिल्ह्यात भाजपचा एल्गार

हे सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे; जिल्ह्यात भाजपचा एल्गार

Next

पालघर : भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस - राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून अवकाळीग्रस्त शेतकºयांना २५ हजार प्रति हेक्टरी मदत देण्याऐवजी फक्त आठ हजार रुपये देऊन अन्य सातबारा कोरा करणे, सरसकट कर्जमाफी ही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक करणाºया महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपकडून संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारी आंदोलने करण्यात आली.

आघाडी सरकार स्थापन करत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ रुपये प्रति हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात याची पूर्तता करण्यात आली नसून सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकºयांची सरसकट फसवणूक करणारी असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांची फक्त अल्पमुदतीची पीक कर्जमाफी केली आहे. बहुसंख्य शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना महाविकास आघाडी कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नसल्याचेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

भाजप सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलीहाऊस, शेडनेट शेती उपकरणे पशूपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकºयांला मिळाला होता. भाजप सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेदारांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. त्यामुळे शेतकºयांची घोर फसवणूक करणाºयां महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पाटीर्ने त्यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच नारळावर पांढरी माशीच्या प्रादुभार्वामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, मच्छीमारांची बिकट परिस्थिती लक्षात घेता ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा, मच्छीमारी बंद कालावधीत खावटी पद्धत सुरू करावी, माहीम पाणेरी नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी व तारापूर येथील एमआयडीसी मधून सोडण्यात येणाºया सांडपाण्याचे नियोजन करण्याच्या मागण्याही केल्या.

महिन्याभरापासून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून अत्याचार करणाºया गुन्हेगारांना चाप बसविण्याऐवजी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार स्वीकारण्यात मश्गूल असल्याची टीका करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका प्रमुख प्रमोद आरेकर, पालघर शहराध्यक्ष तेज हजारी, संतोष जनाठे, नगरसेवक भावानंद संखे, लक्ष्मीदेवी हजारी, अलका राजपूत, सुजित पाटील, अभय दारुवाला आदी पदाधिकाºयांनी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांना निवेदन सादर केले.

सरकारने केला जनादेशाचा केला अपमान
नालासोपारा : शेतकºयांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे महाआघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाद्वारे मंगळवारी वसई तहसीलदार कार्यालयावर जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याची टीका यावेळी करण्यात आली. या आंदोलनात जोगेंद्र चौबे, हरेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार, महिला मोर्चा अध्यक्ष आम्रपाली साळवे, पंचायत समितीच्या उपसभापती वनीता तांडेल, सदस्य अनिता जाधव, वसई शहराध्यक्ष मारुती घुटुकडे, उत्तम कुमार, जितेंद्र पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. दुपारी तीन वाजता निवेदन देऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

निष्क्रिय सरकारविरोधात निदर्शने
वाडा : ‘स्थगिती सरकारचा धिक्कार असो’, ‘महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध असो’, ‘महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून गेला होता. निमित्त होते निष्क्रीय शासनाविरोधात भाजपाने एल्गार पुकारला असून आज वाडा तहसीलदार कार्यालयासमोर भाजप वाडा शाखेच्या वतीने आयोजित आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या.
यावेळी वाडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, बाबाजी काठोले, नंदकुमार पाटील, हेमंत सवरा, तालुका अध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस मंगेश पाटील, पंचायत समिती सदस्य सुवर्णा पडवले, कृपाली पाटील, महिला आघाडीच्या शुभांगी उत्तेकर, मेघना पाटील, भोईर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आघाडीच्या विरोधात भाजपचा मोर्चा
विक्रमगड : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई दिली नाही, असे सांगत तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी भाजपचे संदीप पावडे, सुशिल औसरकर, संतोष भानुशाली, निशिकांत संख्ये, मधुकर खुताडे, महेश आळशी आदी उपस्थित होते.

डहाणूत आघाडी सरकारचा जोरदार निषेध
डहाणू : ढासळत चाललेली कायदा - सुव्यवस्थेचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे डहाणूतही नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार विनोद वागदे यांना सुपूर्द करण्यात आले. डहाणू शहराध्यक्ष भरत शहा, पश्चिम मंडळ अध्यक्ष विलास पाटील, उपनगराध्यक्ष रोहिंटन झाईवाला, जगदीश राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष विवेक कोरे, तानाजी तांडेल, रवींद्र बोस, डहाणू नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक , जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य व शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शेतकºयांच्या तोंडाला पुसली पाने
जव्हार : महाआघाडी सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकºयांची ही फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. जव्हार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पालघर सरचिटणीस विठ्ठल थेतले, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर, जि. प.सदस्य सुरेखा थेतले, सभापती सुरेश कोरडा, माजी सभापती तुळशीराम मोरघा, तालुका अध्यक्ष उमेश सपकाळे, यशोदा भोरे, अशोक भोरे, अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: This government is a traitor to farmers; BJP's Elgar in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा