शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

वाड्यातील गोधडीची ऊब सातासमुद्रापलीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:07 IST

हमरापूरच्या महिला बचत गटाचा उपक्र म : पारंपरिक मराळमोळ्या गोधडीला प्रसिद्धीचे वलय

वसंत भोईर।लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यातील हमरापूर येथील ओमगुरु देव महिला बचत, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, प्रगती ‘अ’ महिला बचत गट, एकवीरा महिला बचत गट आणि साईलीला महिला बचत गट या पाच महिला बचत गटांनी मिळून तयार केलेली गोधडी साता समुद्रापलीकडे गेली असून या गोधडीची उब इंग्लंड, अमेरिकेतील नागरिकही घेत आहेत. तर या गोधडीला तेथील नागरिकांनी ‘हमरापूरची राणी’ हे नावही बहाल केले आहे. त्यामुळे या पारंपरिक मराठमोळ्या गोधडीला चांगलेच प्रसिद्ध वलय प्राप्त होत आहे.दीड हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या हमरापूर या गावातील महिला बचत गट हे नेहेमीच कापडी पिशवी, कपड्यांपासून पायपुसणी, लोकरीचे तोरण, रुमाल, महिलांचे मेकअपचे साहित्य अशा नावीन्यपूर्ण वस्तू तयार करून त्याची विक्री करतात. तीन वर्षांपासून या बचत गटातील दहा महिलांनी एकत्र येत वैशिष्ट्यपूर्ण गोधडी शिवून तिची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.हमरापूर गावापासून अवघ्या दोन किमी. अंतरावर इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असतात. त्यांच्यापर्यंत येथील महिलांनी ही गोधडी पोहचविली आणि अमेरिकामधील पर्यटकांना या गोधडीचा उब चांगलीच भावली. थंडीपासून संरक्षण करणाऱ्या अन्य वस्त्रांपेक्षा या गोधडीतून चांगली ऊब मिळत असल्याने त्यांनी या बचत गटाकडून शंभरहून अधिक गोधड्या विकत घेत त्या सातासमुद्रापार आपल्या देशातही नेल्या आहेत.माजी मंत्री दीपक सावंत यांची प्रकल्पाला भेटच्या मराठमोळ्या गोधडी प्रकल्पाविषयी माहिती मिळताच शिवसेना नेते,माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि. ११) हमरापूर येथे सपत्नीक येवून या प्रकल्पाला भेट देवून बचत गटातील महिलांशी संवाद साधला आणि प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेऊन त्यांच्या समस्याजाणून घेतल्या.या बचत गटांचे लवकरच विलेपार्ले येथे प्रदर्शन भरवणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाविषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी येणाºया अडचणी उदा. गोधडीसाठी लागणारा कच्चा माल, कापूस, कपडा व मार्केटिंगसाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.वजनाला हलकी असलेली ही गोधडी : चांगल्या दर्जाचा रंगीत कपडा घेऊन सहा फूट लांब, सहा फूट रुंद अशी या कपड्यापासून मोठी पिशवी तयार केली जाते. या पिशवीमध्ये चांगल्या दर्जाचा रजईचा दीड ते अडीच किलो कापूस भरला जातो. या गोधडीला सुताचा धागा घेऊन हाताने शिवली जाते. वजनाला हलकी असलेली ही गोधडी अत्यंत कमी तापमानामध्ये तर फार उपयुक्त आहेच, पण अधिक तापमानामध्येही या गोधडीचा वापर केल्यास कुठलाही त्रास होत नाही. एका गोधडीसाठी ६०० ते ७०० रुपये खर्च येतो आणि ती १००० ते १२०० रुपयांपर्यंत विकली जाते. या गोधडीची धुलाई वारंवार करता येत असून ती चार ते पाच वर्षे सहज टिकते असे ओमगुरु देव बचत गटाच्या सचिव हर्षाली पाटील यांनी सांगितले.