कन्येवर बलात्कार करणारा बाप अटकेत, कृत्याला पाठिंबा देणारी आईही अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:30 IST2017-12-09T00:30:23+5:302017-12-09T00:30:58+5:30
पोटच्या मुलीवर अ़नेक वर्ष बलात्कार करणा-या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या कृत्यात सहभागी होऊन पोटच्या मुुलीचा गर्भपात करणा-या आईलाही अटक करण्यात आली आहे

कन्येवर बलात्कार करणारा बाप अटकेत, कृत्याला पाठिंबा देणारी आईही अटकेत
विरार : पोटच्या मुलीवर अ़नेक वर्ष बलात्कार करणा-या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या कृत्यात सहभागी होऊन पोटच्या मुुलीचा गर्भपात करणा-या आईलाही अटक करण्यात आली आहे.
वसईत राहणाºया २४ वर्षीय तरुणीवर तिचा बाप गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार करीत होता. त्याला तिच्या आईचाही पाठिंबा होता. पीडीतीचे लग्न झाल्यानंतरही तिचा बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असे. ही बाब तिच्या पतीला कळताच त्याने घटस्फोट घेतला होता.
काही महिन्यांनी तिच्या आई बापाने तिचे दुसरे लग्न भिवंडी येथील एका तरुणाशी करून दिले होते. यावेळी बापाने जावयाला वसईतच रहायला बोलावले. त्यानंतर बापाने तिच्यावर अत्याचार सुरुच ठेवला होता. याची माहिती पतीला मिळताच त्याने तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्याची माहिती मिळताच आई बाप फरार झाले होते. पोलिसांनी मुंबईतून त्या दोघांना अटक केली.