शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 7:20 AM

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई व पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मृत मासेही आढळले होते. तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये अरबी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. रविवार, 23 सप्टेंबर रोजी चिखले गावातील गावड भंडारी समाजाच्या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री साडेआठच्या सुमारास गावच्या रिठी या चौपाटीवरील विसर्जन घाटावर पोहचली. त्यानंतर सामूहिक आरती झाल्यावर मूर्ती  विसर्जनाकरिता भक्त पाण्यात उतरले.  मूर्तीचे विसर्जन होताच,  ओंजळीत पाणी घेऊन ते बाप्पाला वाहिल्यानंतर, नमस्कार करून पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करण्याची पूर्वापार श्रद्धा येथील भक्तांची आहे.  दरम्यान निरोप देऊन हे भक्त पुन्हा किनाऱ्यावर परतल्यानंतर त्यांच्या हाताला तेलयुक्त चिकटपणा आल्याचा प्रत्यय आला. त्यापैकी अशोक पांडुरंग गावड या साठ वर्षीय भक्ताने लाईटच्या उजेडात दोन्ही हात धरल्यावर ते काळवंडले होते. त्यांनी ही माहिती सोबत असलेल्यांना सांगितली. त्यांनाही हाच अनुभव आला. तर काही भक्तांच्या कपड्यांना तेलमिश्रित डाग लागल्याची माहिती, तेथे उपस्थित चिखले ग्रामपंचायत सदस्य किरण गणपत पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. दोन दिवसांपूर्वीच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील काही किनाऱ्यावर मृत मासे आढळले होते. समुद्राच्या पाण्यात दूषित तेलमिश्रित तवंग पसरून चिकटपणा वाढला आहे. हा समुद्री पर्यावरणाला धोक्याचा इशारा असून या बाबत शासनाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा सागरी जैवविविधता धोक्यात येईल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत."समुद्रातील पाणी ओंजळीत घेऊन ते वाहिल्यानंतर नमस्काराकरिता हात जोडले. काही वेळाने लक्षात आले कि, हाताला तेलकटपणा आला आहे. ते लाईटच्या उजेडात धरल्यावर काळवंडले होते. घरी जाऊन तीन ते चार वेळा साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हा चिकटपणा गेला. हा अनुभव पहिल्यांदाच आला असून ही पर्यावरणाकरिता धोक्याची घंटा आहे." अशोक पांडुरंग गावड(चिखले गावातील गणेशभक्त)

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन