शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

मनसे कार्यकर्त्यामुळे गणेश भेटला कुटुंबियांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:45 IST

पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी सहृदयतेमुळे गणेश पुष्कर डाके या बीड जिल्ह्यातील डाळी-पिंपरी येथील मनोरुग्ण तरुणांची तब्बल सात वर्षांनी आपल्या कुटुंबियासोबत भेट झाली.

पालघर : पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी सहृदयतेमुळे गणेश पुष्कर डाके या बीड जिल्ह्यातील डाळी-पिंपरी येथील मनोरुग्ण तरुणांची तब्बल सात वर्षांनी आपल्या कुटुंबियासोबत भेट झाली.गणेश डाके हा आपल्या तालुक्यात गाजलेला मल्ल म्हणून सर्वत्र परिचित होता. मात्र आपण मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊन मोठे नाव कमवावे या इर्षेने तो कुणालाही न सांगता आपल्या घरातून बाहेर पडला. मात्र त्याने अनेक स्पर्धात सहभागी होण्याचा प्रयत्न करूनही त्याला कुठेही संधी न मिळाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडून तो गावोगावी भटकू लागला. घरातून तो अचानक गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या पदरी निराशा पडत गेल्याने त्यांनी ते सोडून दिले होते.तो अनेक वर्षांपासून मिळेल त्या वाहनाने, पायी चालत सर्वत्र भटकत होता आणि दिसेल त्या व्यक्तीकडून काही तरी खायला मागून तो आपले पोट भरीत होता. मंगळवारी पालघरचे मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्या वडा-पावच्या दुकानाजवळ गणेश काही तरी खाण्यासाठी हात पसरत होता. त्यामुळे तुलशी जोशी याने त्याला खायला देऊन सहज त्याची विचारपूस केली. मात्र तो काही विशेष माहिती देत नसल्याने त्याच्याकडील पिशवी तपासून पाहिली असता त्यात त्याचे मतदान कार्ड मिळाले. त्यावर तो बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचा पत्ता मिळाला.तात्काळ जोशी यांनी मनसे बीड जिल्हा सचिव अभिषेक गोल्हार तसेच मारु ती दुनगे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला व तो पत्ता शोधण्याची विनंती केली. तोपर्यंत जोशी यांनी एका सलूनमध्ये नेऊन त्याचे केस, दाढी कापून त्याला आंघोळ घालून नवीन कपडेही त्याला घातले. नंतर पालघर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांनाही त्याची माहिती दिली. पोलिसांनी ही गणेशच्या कुटुंबियांशी बीडला संपर्क साधून त्यांना पालघरला बोलावून घेतले.मंगळवारी गणेशचे वडील, भाऊ आणि सरपंच असे १० ते १२ लोक कार ने पालघर कडे रवाना झाले. यावेळी ते सतत तुलसी यांच्या संपर्कात राहून कृपया आमच्या गणेशला सांभाळून ठेवा, त्याला कुठेही सोडू नका असे सतत विनवीत होते. अखेर बुधवारी सर्व कुटुंबीय पालघरला पोचले.मागील सात वर्षांपासून त्याच्या विरहाने व्यथित झालेल्या कुटुंबीयांनी त्याला मिठी मारली आणि सर्व आॅक्सबोक्शी रडू लागले. त्यामुळे इथे तुलसी जोशी यांनी एका जवाबदार नागरिकाप्रमाणे तत्परता दाखवून आपल्या कुटुंबिया पासून दुरावलेल्या गणेशची भेट घडवून आणल्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :MNSमनसेFamilyपरिवार