उद्धव सेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:10 IST2025-02-12T16:09:53+5:302025-02-12T16:10:09+5:30
प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत चर्चा केली.

उद्धव सेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील उद्धव सेनेच्या माजी नगरसेवकांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज बुधवारी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
भाईंदरच्या उत्तन भागातील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेविका हेलन गोविंद यांचे माजी नगरसेवक पती जॉर्जी गोविंद सह मच्छीमार नेते व माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी प्रवेश केला. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा देखील यावेळी उपस्थित होते.
शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. दरम्यान प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत चर्चा केली.