शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:11 AM

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार  - पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे उघडपणे नसले तरी सर्वच पक्षांच्या अंतर्गत हालचालीना वेग आला असून भाजपा नेमकी कुणाला उमेदवारी देणार यावरूनच सर्व पक्षांच्या भूमिका ठरणार असल्याचे वृत्त आहे.२०१४ च्या पालघर लोकसभेच्या निवडणूकीत दिवंगत वणगा यांनी २ लाख ३९ हजार मतांनी विरोधकाना धुळ चारली होती. हा कार्यकाल संपायला १५ महीन्याचा कालावधी उरला असताना त्यांच्या निधनाने रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विशेषत: ही निवडणूक कॉंग्रेसने गांभिर्याने घेतली असून इतर पक्षांचे मात्र खल सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेची भूमिका भाजपचा उमेदवार कोण असेल यावर ठरणार असल्याचे कळते आहे. कारण जर वणगांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास सेना निवडणूक लढवणार नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील राजकारणात अल्पावधीमध्ये प्रभावी राजकीय पक्ष ठरलेला बहुजन विकास आघाडीची भूमिका सुद्धा कलटणी देणारी ठरणार आहे.मुळात गोंदीया येथील खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली लोकसभेची जागा आणि पालघर लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक भाजप आणि कॉंग्रेससाठी अतिशय महत्वाची ठरणारी आहे. अगदी कमी कालावधीसाठी जरी ही पोटनिवडणुक होणार असली तरी पालघर हा भाजपाचाच बालेकिल्ला असून मोदी लाट देशात कायम आहे. हे भाजपाला या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे तर भाजपाची लाट ओसरत असून ही जागा आपल्या पदरात ओढून देशात कॉंग्रेसचे पुनरागमन होत आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसला दाखविण्याची संधी असणार आहे.तसेच या पोटनिवडणुकीच्या निकालाचा मोठा परीणाम राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीवरही होणार आहे. यामुळे भाजपावर मोठा दबाव आहे.काँग्रेस निवडणुका सिरीयसली घेणारकाँग्रेसने ही निवडणूक सिरीयसली घेतली असून नुकतेच राजस्थान मधील पोटनिवडणुकीच्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. याशिवाय भाजप विरोधी पक्षही एकवटलेले आहेत आमच्याकडे अनेक उमेदवारही या लोकसभेसाठी तयार आहेत फक्त उमेदवार निश्चिती बाकी आहे.- केदार काळे,जिल्हाध्यक्ष, काँगेस पालघरअजून आमची याबाबत बैठक झाली नसून काहीही ठरलेले नाही. पण कमी कालावधीसाठीची ही निवडणूक लढवायची किंवा नाही यासाठी सर्व पक्षीय निर्णय सुद्धा घेता येईल तस आम्ही ठरवू. जिल्ह्याच्या विकासासाठी चांगला निर्णय झाला तर तसं अन्यथा लढवायची ठरली तर लढवलीही जाईल.- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष,बहुजन विकास आघाडीअद्याप याबाबत आदेश आलेला नसला तरी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबच याबाबत निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य राहील.- राजेश शहा, जिल्हा प्रमुख, शिवसेना पालघरआमच्या पक्षाची बैठक असून त्यामध्ये याबाबत आमची भूमिका निश्चित होईल. आमची कमिटी जो निर्णय घेइल तो आम्हाला मान्य राहील.- रतन बुधर,राज्य कमिटी सदस्य,माकपाकॉंग्रेस सोबत आमची आघाडी असताना ही जागा कॉंग्रेसकडे होती. तसेच सध्या वरीष्ठ पातळीवरु न आघाडीचे संकेत मिळत असल्याने तसे झाल्यास आम्ही कॉंग्रेस सोबत जावू. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकी बाबत आमचे वरीष्ठच निर्णय घेतील.- सुनील भुसारा,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीही लोकसभेची जागा आमचीच होती. राज्यातील पोटनिवडणुकीचे आजवरचे चित्र पाहता जिथे सेना लढली तिथे आम्ही त्यांना पाठींबा दिला. पालघर विधानसभेतही तेच झाले यामुळे आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेना आमच्या बरोबर राहील असे दिसते.- बाबजी काठोळे, प्रदेश सदस्य, भाजप

टॅग्स :PoliticsराजकारणVasai Virarवसई विरारElectionनिवडणूक