कपड्यांच्या दुकानात पाचवेळा झाली चोरी, पाच गुन्हे दाखल, कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:56 IST2018-02-18T05:56:36+5:302018-02-18T05:56:46+5:30

पालघर रस्त्यावरील मनोर बस स्थानकाच्या व पोलीस चोकीच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानाचे छत तोडून चोरट्यांनी लाखो रु पयांचे कपडे व काही वस्तू लंपास केले त्याच दुकानात आता पर्यंत पाच वेळा चोरी झाली आहे.

Five times in the clothes shop, theft, filing five cases, | कपड्यांच्या दुकानात पाचवेळा झाली चोरी, पाच गुन्हे दाखल, कारवाई शून्य

कपड्यांच्या दुकानात पाचवेळा झाली चोरी, पाच गुन्हे दाखल, कारवाई शून्य

मनोर : पालघर रस्त्यावरील मनोर बस स्थानकाच्या व पोलीस चोकीच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानाचे छत तोडून चोरट्यांनी लाखो रु पयांचे कपडे व काही वस्तू लंपास केले त्याच दुकानात आता पर्यंत पाच वेळा चोरी झाली आहे.
मनोर बस्थानकावर हसमुख जैन यांचे अशोक क्लॉथ स्टोअर्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. रात्री चोरट्यांनी त्या दुकानात शिरून जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, लेडीज कपडे इतर वस्तू असा एकूण एक लाखाचा माल लंपास केला. तसेच या आधीही याच दुकानामध्ये २०१२-१४ या काळात अशाच रितीने चोरी झाली होती. त्या आधी ही दोन वेळा झालेली चोरी लक्षात घेता एकूण पाच वेळा चोरी झाल्याचे मालकाने सांगितले. मात्र त्यांचा कोणताही छडा पोलिसांनी अद्यापही लावलेला नाही. हे दुकान भरगच्च वस्ती मध्ये आह.े बाजूला पोलीस चोकी आहे, तरी सुद्धा हे घडले आहे.


तक्रारी नोंदवून उपयोग काय? दुकानदार हताश
दुकानाचे मालक हसमुख जैन म्हणाले की, आता पर्यंत पाच वेळा दुकानात चोरी झाली आहे. प्रत्येक वळा चोरीची तक्र ार नोंदवली आह.े पोलीस येतात पंचनामे करतात. त्या नंतर पुढे कारवाई शून्य पाच पैकी एकही चोरीचा छडा मनोर पोलिसांनी लावलेला नाही. चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे

Web Title: Five times in the clothes shop, theft, filing five cases,