पास्थळ येथे एका रात्रीत पाच दुकाने फोडली

By Admin | Updated: May 5, 2016 01:07 IST2016-05-05T01:07:24+5:302016-05-05T01:07:24+5:30

तारापूर पोलीसस्थानक क्षेत्रातील पास्थळ गावातील वेगवेगळ्या भागातील एकाच रात्रीमध्ये पाच दुकाने फोडून त्यातील माल चोरून नेल्याने परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

At five places in Shasta, five shops were broken | पास्थळ येथे एका रात्रीत पाच दुकाने फोडली

पास्थळ येथे एका रात्रीत पाच दुकाने फोडली

बोईसर : तारापूर पोलीसस्थानक क्षेत्रातील पास्थळ गावातील वेगवेगळ्या भागातील एकाच रात्रीमध्ये पाच दुकाने फोडून त्यातील माल चोरून नेल्याने
परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तर एका ठिकाणी जाग्या झालेल्या नागरीकांवर चोरांनी दगडफेक केल्यानंतर नागरीकांनीही दगडफेक केली.
पास्थळ येथील आत्मशक्तीनगरमधील चंपालाल घाची यांचे हितेश स्टोअर्स फोडून एक मोबाईल व ६,४०० रु., महेंद्र शाह यांच्या महालक्ष्मी स्टोअर्समधून सुमारे २० हजारांच्या वस्तू व कॅश रु. १० हजार , सीमा कांबळी यांच्या ब्रज किराणा स्टोअर्स
मधून वस्तू व ११०० रुपये कॅश
चोरांनी पळवून नेली आहे तर सालवड पाड्यातील उमेश राऊत व पास्थळ येथील विकास राऊत यांचेही दुकान चोरांनी फोडले.
या संदर्भात तारापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून आत्मशक्तीनगरमध्ये वाढलेली वस्ती व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या भागात पोलीस चौकी सुरु करावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी विदूर पाटील, शाम देशमुख व नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: At five places in Shasta, five shops were broken