खंंडणीप्रकरणी पाच जणांना अटक
By Admin | Updated: June 17, 2017 00:45 IST2017-06-17T00:45:32+5:302017-06-17T00:45:32+5:30
बिल्डरकडे पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई पोलिसांनी विरार येथून पाच जणांना अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.

खंंडणीप्रकरणी पाच जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : बिल्डरकडे पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई पोलिसांनी विरार येथून पाच जणांना अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.
विरार येथील बिल्डर आशुतोष जोशी यांनी आपल्या इमारतींमधील पवन सरकाळे, देवेन कोचरेकर, राजन वझे, राजदीप दळवी, अनिष सावे, जयेश शाह, देवेंद्र गोंडले यांनी पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी वसई पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.