नालासोपा-यातील अजय झा हत्या प्रकरणी 5 आरोपींना धुळ्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 13:53 IST2017-10-03T13:53:20+5:302017-10-03T13:53:34+5:30
गरबा खेळण्यावरुन झालेल्या वादात नालासोपा-यात येथील अजय कन्हैया झा या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या अजय झाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे.
_201707279.jpg)
नालासोपा-यातील अजय झा हत्या प्रकरणी 5 आरोपींना धुळ्यातून अटक
वसई - गरबा खेळण्यावरुन झालेल्या वादात नालासोपा-यात येथील अजय कन्हैया झा या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या अजय झाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पळून जात असताना या पाच आरोपींना मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याजवळ असलेल्या लळींग टोल नाका याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. धुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाच आरोपींपैकी तीन आरोपी हे 19 वर्षांचे आहेत.
नरसिंह रमेश आदवळे (वय २१), अभिषेक नरेंद्र प्रतापसिंह ( वय १९ ), प्रतीक अरविंद गुप्ता (वय १९), धीरज दीनानाथ सिंग (वय १९ ), मोहम्मद सोयेब मोहम्मद सिद्धीकी (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण सध्यातरी नालासोपारा येथील रहिवासी आहेत. दरम्यान, यापूर्वी तीन जणांना वालीव पोलिसांनी अटक केली होती. फरार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली आहे.