सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:49 PM2019-01-07T22:49:19+5:302019-01-07T22:49:44+5:30

मच्छीचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले : खवय्यांच्या खिशाला कात्री, कोळीही नाराज

Since fishing due to surveillance, the fishermen also hit customers | सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका

सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका

Next

विरार : ओ.एन.जी.सी.ने तेल आणि वायूचा साठा शोधण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे दीड महिने मासेमारी बंद असणार आहे. काही विभागात मासेमारी बंद असल्यामुळे मोठ्या माशांचे दर वाढलेले आहेत. मासेमारी नसेल तर त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांचे हाल होणार आहेतच, पण किंमत वाढल्यामुळे ग्राहकांना देखील आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. हिवाळ्यात ज्या माशांची सर्वात जास्त मागणी असते त्याच माशांचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

दरवर्षी प्रमाणे ओ.एन.जी.सी ने वर्षाच्या सुरु वातीला अचानक मोहीम राबवण्याची सूचना दिल्याने मासेमारांचे धाबे दणाणले आहेत. मासेमारी दीड महिन्यांसाठी ठप्प होणार आहे तर किनाºया जवळच मासेमारी सुरु असल्याने हवे तसे मासे मिळत नाहीत. यामुळे माशांचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. माशांचे दर वाढल्याने मासे खाणाºयांंचे हाल होणार आहेत. हिवाळ्यामध्ये मासे गरम उब मिळवण्याकरिता समुद्रकिनाºया पासून लांब जातात व ओ.एन.जी.सी आपल्या सर्च आॅपरेशन अंतर्गत पाण्यात स्फोट करीत असल्याने लांब गेलेले मासे या ध्वनी प्रदुषणामुळे आणखी लांब जातात तर काही मासे मारतात. या स्फोटामुळे जल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे अजून काही महिने मासेमारी करता येणार नसल्याचे ओ.एन.जी.सीने सांगितले आहे.

कोळी लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, आता मासेमारी बंद होणार असल्याने घर कसे चालवायचे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. या मोहिमेमुळे मच्छी विक्र ीचे प्रमाण कमी होते व मासेमारी करणाºयांच्या उत्पन्नावर फरक पडतो. किनाºयाजवळ मच्छी मिळत असली तरी, त्याचा हवा तसा दर मिळत नाही. त्यामुळे मासेमारी करणाºयांना याचा मोठा धक्का बसलेला आहे.

हिवाळ्यात जे मासे खाण्यासारखे असतात ते खाण्यासाठी देखील ग्राहकांना दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. ओ.एन.जी.सी च्या या मोहिमेत अनेकांचे नुकसान झाले आहे. पण आॅगस्ट नंतर मासेमारी खºया अर्थाने सुरु होते त्यामुळे या मोहिमेसाठी हीच योग्य वेळ आहे असे देखील बोलले जात आहे. दरम्यान, या मोहिमेमुळे कोळ्यांचे नुकसान तर खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मोठे मासे तर मिळतच नाहीत मात्र छोट्या माशांचे दर वाढल्याने ग्राहक देखील मासे खरेदी करतांना खूपच विचार करतात. त्यामुळे आम्हाला रोजगार कमी मिळत आहे. आमचा या मोहिमेला विरोध नसून, स्फोट करण्याला विरोध आहे. विस्फोट न करता जर ही मोहीम राबवली गेली तर जास्त चांगल असेल असे आम्हांला वाटते.
- लिओ कोलॅसो, अध्यक्ष (पाचूबंदर मच्छीमार समिती )

Web Title: Since fishing due to surveillance, the fishermen also hit customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.