मच्छीमार नेते राजू तांडेल शिवसेनेत दाखल

By Admin | Updated: January 31, 2017 03:32 IST2017-01-31T03:32:08+5:302017-01-31T03:32:08+5:30

मच्छिमार स्वराज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे नेते राजू तांडेल यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

Fisherman leader Raju Tandel filed for Shiv Sena | मच्छीमार नेते राजू तांडेल शिवसेनेत दाखल

मच्छीमार नेते राजू तांडेल शिवसेनेत दाखल

वसई : मच्छिमार स्वराज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे नेते राजू तांडेल यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी तांडेल यांचा प्रवेश घडवून आणला.
राजू तांडेल यांनी मच्छिमार स्वराज्य समितीची स्थापना करून मच्छिमारांच्या प्रश्नावर अनेक लढे दिले आहेत. पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार समाजात तांडेल यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तांडेल यांनी काही महिन्यांपूर्वी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून राजकारणाची वाट धरली होती. मात्र, वसई विरार महापालिकेत मच्छिमारांच्या प्रश्नांवर मुस्कटदाबी होत असल्याने तांडेल नाराज होते. त्यानंतर त्यांनी रविवारी अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.
तांडेल यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने बहुजन विकास आघाडीला हादरा बसला आहे. तर तांडेल यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करून स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही आपले महत्व दाखवून दिले. महत्वाचे म्हणजे तांडेल यांचा मोठा गाजावाजा करीत शेकडोे मच्छिमारांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश होत असताना वसई तालुक्यातील शिवसेनेचा एकही पदाधिकारी हजर नव्हता. तांडेल यांचा प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी एकनाथ शिंदे, पक्ष सचिव खासदार अनिल देसाई, आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fisherman leader Raju Tandel filed for Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.