शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पहिल्याच पावसात ‘महावितरणची बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:14 PM

वसई, नालासोपारा, मनोर, बोईसर, जव्हार शहर अंधारात : एकाचा मृत्यू, घरांवरील पत्रे उडाले, अनेक वृक्ष, विजेचे खांब कोसळले

नालासोपारा : वसई तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या अत्यंत तुरळक पहिल्याच पावसामुळे महावितरणची बत्ती गुल झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण झाला आहे.

वसई, विरार पश्चिम व नालासोपारा शहरात आठच्या सुमारास वीज गेली ती रात्री अडीचच्या सुमारास आली. तर पूर्वेकडील परिसरात मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली. नाममात्र पाऊस पडूनही आणि वारा वगैरे नसतांनाही वीज जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये महावितरण विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या वीज जाण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा परिसरात मेन लाइनवर झाड पडल्याने वीज गेल्याचे सांगण्यात आले. पावसाळा अद्याप सुरू झाला नाही तर महावितरणच्या विजेचा सावळागोंधळ सुरू झाला असून अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरु वात केली आहे. याबाबत सुधारणा झाली नाहीतर अनेक संघटना आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.वीज २२ तास गायब, २७५ गावपाडे बुडाले अंधारातमनोर : पहिल्या पावसातच पालघर तालुक्यातील टाकव्हल सवरखंड सबसेंटरमध्ये ट्रान्सफार्मर जळल्याने २७५. गाव पाड्यातील वीज२२ तास खंङित झाल्याने जनतेचे प्रचंड हाल झाले. रविवारी संध्याकाळी पावसाने वादळीवाºया सहित हजेरी लावली. त्यामुळे टाकव्हल सवरखंड येथील महावितरणचे सबसेंटर आहे. या परिसराला वीज पुरविणाºया ट्रान्सफार्मरमध्ये त्यात पाणी शिरल्याने तो जळाला. त्यामुळे वीज खंडित होऊन सर्वत्र अंधार पसरला. २२ तास वीज खंडित झाल्याने परिसरातील हॉटेल चालक, पेट्रोलपंप तसेच नागरी वस्तीमधील दुकानदार लहान मुले व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गणवीर अधिकारी वीज मंडळ यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले, ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने वीज खंडित झाली.जव्हरला पावसाने झोडपलेच्जव्हार : जव्हारमध्ये सोमवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले, मंगळवारी मात्र दिवसभर उन्हाचे असह्य चटके लागत होते, सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामुळे सर्वत्र गारवा पसरला. मात्र या पावसामुळे मात्र महावितरण विभागाचे नखरेसुरू झाले असून वारंवार वीज खंडीत होत आहे. त्यामुळे उकाडा वाढतो आहे.च्पावसाने लावलेल्या हजेरीमुळे परीसर जलमय झाला होता. बळीराजा आता पेरणीच्या कामाला लागला आहे. कुडा-मातीच्या घरांवर व गोठ्यांच्या छतावर व आजूबाजूने प्लास्टीक अथवा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर नांगरणीला व हंगामपूर्व कामांना आता वेग येईल.विजेचा शॉक लागून तरु णाचा दुर्दैवी मृत्यूच्वाडा, तालुक्यातील कंचाड पासून काही अंतरावर असलेल्या शेलरपाडा येथील एक तरु णाच्या सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्याचे लक्षात आल्याने त्याने स्विच बोर्ड तपासण्याचा प्रयत्न केला असता त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे.च्कंचाड पासून अवघ्या तीन किलोमीटर असलेल्या शेलार पाडा येथील एकनाथ झपिर शेलार (२७) हा सकाळी झोपेतून उठला असता घरातील विद्युत पुरवठा बंद असल्याचे लक्षात आल्याने त्याने स्विच बोर्ड उघडून पाण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एक तुटलेली वायर लोम्बकळत असल्याने त्याचा त्या वायरला स्पर्श होऊन जबरदस्त शॉक लागल्याने तो खाली पडला, त्याला तात्काळ वाडा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तो मयत झाला असल्याचे डॉ.प्रदीप जाधव यांनी सांगितले.च्एकनाथ हा मेहनती व घरातील कमावता व्यक्ती होता तो टेम्पो चालवून परिवाराचा उदरिनर्वाह करत होता. त्याच्यामागे आई,पत्नी व दोन मुली असा परिवार आहे एक वर्षांपूर्वीच त्याचे वडीलही वारले आहेत.वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊसवसई : वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने वसई-विरार पट्ट्यात सोमवारी रात्री १० वाजल्यानंतर हजेरी लावली. वसई, विरार भागात पावसाने बरसात करून लोकांना अचानक चिंब केले. काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्याने रस्ते ओले झाले व उकाड्याने त्रस्त लोकांना काही अंशी तर गारवा मिळाला. त्यातच सोसाट्याचे वारे व विजेचा कडकडाट होत असल्याने खबरदारी म्हणून वसई विरार व काही भागातील वीजपुरवठा बºयाच तासासाठी खंडित करण्यात आला होता. दरम्यान अखेर उशिरा का होईना मात्र वरु णराजाने वसईत आगमन केले. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आता बळीराजा शेतीच्या कामांना सुरुवात करणार आहे. त्यासाठी लागणारी अवजारे आणि सामग्री खरेदी करण्यासाठी त्याची धावपळ सुरु आहे. बाजारामध्ये आवश्यकत्या बियाणे आणि औषधे व किटकनाशके यांचीहीउपलब्धता असल्याचे दिसून येते आहे. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार