शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

पालघर जिल्ह्यात एका महिलेने उभारली पहिली चिकू, फ्रूट वायनरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:08 IST

पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य बोर्डी गावातील श्रीकांत सावे यांच्या उच्च विद्याविभूषित कन्या प्रियंका यांनी चिकू, आंबा, अननस आणि स्टार फ्रुट आदी विविध फळांपासून वाइन तयार केली आहे.

अनिरुद्ध पाटीलडहाणू : पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य बोर्डी गावातील श्रीकांत सावे यांच्या उच्च विद्याविभूषित कन्या प्रियंका यांनी चिकू, आंबा, अननस आणि स्टार फ्रुट आदी विविध फळांपासून वाइन तयार केली आहे. त्यामुळे ही चिकूची वाइनरी बोर्डीलगतच्या बोरिगाव या आदिवासी पाड्यावर स्थापित झाली असून तिला पर्यटनाचे कोंदण लाभून त्याची ख्याती जगभरात पसरली आहे.जागतिकस्तरावर चिकू या फळाला घोलवड चिकू असं भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. बोर्डी रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला बोरीगाव येथे जगातील पहिली चिकू वायनरी आदिवासी पाड्यावर निर्माण झाली आहे. येथे आंबा, अननस या फळांबरोबरच दालचिनी आणि मधापासूनही वाइन बनवण्याचे तंत्र प्रियंका यांनी विकसीत केले आहे. याकरिता त्यांचे हॉटेल व्यावसायिक वडील श्रीकांत सावे आणि पती नागेश यांचा मोठा हातभार लागला आहे.आज प्रियंका यांची वाइन लेडी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. मुंबईसह पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये या वेगवेगळ्या फळांपासून तयार केलेल्या वाइनला विशेष मागणी असून घोलवड आणि बोर्डी परिसरात वाइन पर्यटनाला चालना देण्याचा कार्य सावे कुटुंबीयांनी केले आहे.१९७६ च्या सुमारास पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात शिकत असताना घरी परतण्यास गाडी नसल्याने फावल्या वेळेत श्रीकांत सावे यांनी पालघर येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. १९८० मध्ये ते एका कॉन्व्हेन्ट शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.त्यानंतर या महाविद्यालयातही शिकवू लागले. १९८२-८३ पर्यंत ते शिक्षकी पेशात होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबीरेही ते घेत असत. त्याच जोडीने त्यांनी १९८० मध्ये एक लहानसे हॉटेल सुरू केले. १९८५ च्या सुमारास बोरीगाव येथील एक डोंगर विकत घेऊन त्यांनी एक कोटी रु पयांचे कर्ज घेऊन ‘हिल झलि’ नावाचे रिसॉर्ट सुरू केले.याचा पुढचा टप्पा वाइन उद्योेगाला पोषक ठरला. कारण त्यानंतर त्यांच्यातला फळ उत्पादक जागृत झाला. चिकू या नाशवंत फळाला बाजारामध्ये पुरेसे स्थान मिळत नसल्याची खंत सावे कुटुंबीयांना होती. त्यातून हा प्रकल्प साकारला.>कॅनडा येथून उद्योगासाठी मिळाले सल्ले , स्ट्रॉबेरी, संत्री, मध यापासूनही केली उत्तम वाइनवाइनचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी प्रियंका सावे यांनी वाइन परीक्षणा संदर्भातील अभ्यासक्र म उत्तीर्ण केला. त्यांनी अमेरिकेमधून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. दहा ते पंधरा रु पये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या चिकूची मूल्य वृद्धी व्हावी, या नाशवंत फळाला वैभव प्राप्त करून देता यावे तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, चिकूपासून वाइन करण्याचा विचार केला. कॅनडा येथील वाइन क्षेत्रातील सल्लागार डॉमनिक रिवॉर्ड यांची मदत त्यांना झाली. चिकू या फळातील चीकजन्य पदार्थ वेगळा केल्यानंतर त्यापासून वाइन करणे शक्य झाले. फळातील नैसर्गिक गोडवा, स्वाद आणि गंध यांचा उपयोग करून त्यांनी चिकूपासून वाइन करण्याचे तंत्र अवगत केले. भविष्यात या प्रकल्पाला राजाश्रय मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी प्राप्त होईल असा विश्वास सावे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.>फळांच्या वाइनचे मार्केटींग : चिकूपासून वाइन करण्याचे तीन बॅच उत्पादन घेतले गेले असून त्या बरोबरीने स्टारफ्रुट (कमरक), अननस, राजापुरी आंबा, स्ट्रॉबेरी, दालचिनी तसेच मधापासून वाइनचे उत्पादन घेतले. ‘फ्रुङझान्ते’ या ब्रॅण्डअंतर्गत या फळांच्या वाइनचे मार्केटिंग करण्यात येत असून राज्यातील विविध शहरी भागांमध्ये या वाइनला विशेष मागणी आहे. अल्कोहोलचे कमी प्रमाण आणि १०० टक्के ग्लुटोनमुक्तता हे या तिचे वैशिष्टयÞ आहे.>आदिवासीबांधवासाठी कटिबद्ध : द्राक्षापासून तयार करण्यात येणाºया वाइनला राज्य उत्पादन शुल्क माफ आहे, मात्र इतर सर्व फळांच्या वाइनवर १०० टक्के उत्पादन शुल्क लावले जात असल्याने चिकूची वाइन तुलनात्मक महाग आहे. तरी देखील या वाइनच्या विशिष्ट स्वादामुळे ती प्रसिद्ध होत आहे. हा भाग वाइन पर्यटन म्हणून ओळखला जावा, याकरिता ठोस कार्य करण्याचा मानस सावे कुटुंबीयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. स्टारफ्रुट पासून तयार करण्यात येणाºया वाइनला ‘जीवा’ म्हटले जाते.>चिकू, स्टारफ्रुट (कमरक), अननस, राजापुरी आंबा, स्ट्रॉबेरी, दालचिनी तसेच मधापासून वाइनचे उत्पादन घेतले आहे. तर महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीपासून तर संत्र्यांची वाइन मे मध्ये येईल.-प्रियंका सावे, उद्योजिका