शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कोरोना रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:07 AM

शासकीय दरानेच उपचार करा : खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : जिल्ह्यातील आठ खाजगी रुग्णालयांतून कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्यानंतर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी अशा पिळवणुकीच्या प्रकारांवर आळा बसावा, यासाठी कारवाईचे आदेश पारित केले आहेत.

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोरोना उपचारासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय सेवा अपुरी पडू लागली आहे. आरोग्य सेवेत असलेली रिक्त पदे भरण्याचे काम अजून कोणत्याही लोकप्रतिनिधींना जिल्हा निर्मितीनंतर आजतागायत जमलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. याचा प्रत्यय कोरोनाकाळात अनेक नागरिकांना येत आहे. 

बोईसर टिमा हॉस्पिटल, पालघर ग्रामीण रुग्णालय, रिव्हेरा विक्रमगड रुग्णालय आदी रुग्णालयांत अनेक रिक्त पदे असतानाही तेथील डॉक्टर, सिस्टर आदी आरोग्य सेवेतील लोकांनी कोरोनाकाळात रुग्णांना उत्तम सेवा पुरवत हजारोंचे प्राण वाचविण्याचे कसब साधले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास नियुक्त कर्मचाऱ्यांची तशीच परिस्थिती असताना आरोग्य सेवा ढेपाळल्याने सध्या रुग्णांना बेड मिळण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

शासकीय नियमानुसार रुग्णांकडून बिलाची आकारणी करावी तसेच आकारणी करत असलेल्या विलंबाबाबत रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना पूर्वकल्पना देणे अपेक्षित असल्याचे सांगून रुग्णालयामार्फत आकारणी करत असलेल्या शुल्काचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांच्या माहितीकरिता लावणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी या रुग्णालयांच्या संचालकांना लेखी कळवले आहे. 

खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या बिलांची फेरतपासणी होणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती या रुग्णालयातील अवास्तव बिलांची तपासणी करणार आहे. सर्व बाबी शासकीय नियमानुसार खाजगी रुग्णालयांनी अमलात आणायच्या आहेत. त्या अमलात न आणल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

दर निश्चित, तरीही खाजगी रुग्णालयांकडून लूट nकोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी दिली असली, तरी या खाजगी रुग्णालयांमधून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना शासनाने रुग्ण उपचारांच्या दरांची नियमावली बनवताना दरनिश्चिती जाहीर केली आहे. परंतु, शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा अवास्तव दराने रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येऊ लागल्या होत्या. nबोईसरमधील एका खाजगी रुग्णालयाने लाखो रुपयांचे बिल कोरोना रुग्णाच्या माथी मारल्याबाबतचा मुद्दा अलीकडेच प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ  यांनी नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी पालघर आणि बोईसरमधील ८ खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या