अखेर विरारला पासिंग ट्रॅक लाभला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:03 IST2018-08-22T00:03:12+5:302018-08-22T00:03:28+5:30

एचडीआयएलचे दातृत्व; मालक, चालकांचे नष्टचर्य अखेर संपले

Finally Virar got the passing track | अखेर विरारला पासिंग ट्रॅक लाभला

अखेर विरारला पासिंग ट्रॅक लाभला

वसई : एचडीआयएल कंपनीने भूखंड मोफत दिल्यामुळे वसईला व्हेइकल पासिंग ट्रॅक लाभला आहे. त्यामुळे त्यासाठी १२० किलोमीटरवरील कल्याण येथे जाण्याचा व आठ-आठ दिवसांची रखडपट्टी सहन करण्याचा वाहन मालक व चालकांचा त्रास टळला असून आता येथे दररोज दोनशे वाहनांची पासिंग होणार आहे.
पासिंग ट्रॅक नसलेल्या आरटीओ कार्यालयांना वाहनांची पासिंग करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली. त्यामुळे मुंबई, वसई आणि ठाणे परिवहन कार्यालयात गेल्या ३ महिन्यांपासून पासिंग बंद होती. त्यामुळे कल्याण येथील आरटीओ कार्यालयात पालघर जिल्ह्यातील वाहन चालकांना जावे लागत होते. कल्याण आरटीओ कार्यालयात मुंबई आणि ठाण्यातून वाहने येत असल्याने पालघर जिल्ह्यातील वाहन चालकांना कल्याणमध्ये चार पाच दिवस ताटकळत बसावे लागत होते. ही समस्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या निदर्शनास आणून देऊन वाहनचालकांनी मदत मागितली होती.
त्यावर जवळच्या एचडीआय एल कंपनीकडून हितेंद्र ठाकूर यांनी पासींग ट्रॅकसाठी जागेची मागणी केली. या कंपनी ने ती मोफत दिल्यामुळे सोमवारी सकाळी विरारच्या आरटीओ कार्यालयातील ट्रॅक सुरू करण्यात आला. आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते ट्रॅक सुरू करण्यात आला. महापौर रुपेश जाधव यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.

Web Title: Finally Virar got the passing track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.