शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
4
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
5
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
6
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
7
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
8
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
9
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
10
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
11
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
12
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
13
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
14
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
15
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
16
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
17
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
18
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
19
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
20
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:31 IST

पालघर जिल्ह्यात लसींचा साठा कमी असल्याने मंदगती : नागरिकांमध्ये नाराजी

ठळक मुद्देदरम्यान, लसींच्या साठ्यानुसार सेशन उपलब्ध करून दिले जातात. लसींचा उपलब्धतेनुसार दिवसात फक्त दोन तास लसीकरण पर्याय उपलब्ध होतो. त्यानुसार सकाळी दोन तास केंद्र सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्क जव्हार : पालघर जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा शिल्लक नसल्याने लसीकरण मोहीम अगदी संथगतीने सुरू आहे. दरम्यान, सोमवारी बाहरेच्या व स्थानिकांच्या लसीकरणावरून जव्हार येथे वाद झाल्यामुळे एका दिवसासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते, मात्र मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत लसीकरण करण्यात आले. यात जास्तीत-जास्त स्थानिकांना लसीकरण करण्यात आले असून, केंद्र पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे.केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ऑनलाईन अर्ज भरताना लसीकरण केंद्राचे पर्याय निवडताना कुठलेही केंद्र निवडता येते. त्यामुळे ज्या ठिकाणी लसींचा साठा शिल्लक आहे, तेथील पर्याय निवडून मुंबई, वसई, विरार या शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने जव्हारला नोंदी करून येथे येणे सुरू केले. मात्र सोमवारी झालेल्या गोंधळामुळे आता स्थानिक नागरिकही जागरूक झाले असून, मंगळवारी सकाळी दोन तास लसीकरण करण्यात आले. वेळेची मर्यादा संपल्यानंतर केंद्र बंद करण्यात आले. मंगळवारीही बाहेरगावाहून नागरिक मोठ्या संख्येने आले होते, मात्र वेळ निघून गेल्यामुळे त्यांना माघारी जावे लागले. 

दरम्यान, लसींच्या साठ्यानुसार सेशन उपलब्ध करून दिले जातात. लसींचा उपलब्धतेनुसार दिवसात फक्त दोन तास लसीकरण पर्याय उपलब्ध होतो. त्यानुसार सकाळी दोन तास केंद्र सुरू होते. त्यात जास्तीत-जास्त स्थानिकांनी लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मराड यांनी दिली. मंगळवारी सकाळी ९ ते ११ या दोन तासांकरिता लसीकरण करण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्यात मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. केंद्र सुरळीत सुरू करण्यात आलेले आहे, अशी माहिती  जव्हारचे उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी दिली. दरम्यान, तालुक्याबाहेरील लोकांनी सोमवारी जव्हार येथील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली होती. वसई, विरारसह अन्य भागातील लोक जव्हारला लसीकरणासाठी पोहोचले होते. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तेथे मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांनाही बोलवावे लागले होते. मंगळवारीही काही लोक बाहेरून आले होते. परंतु केवळ दोन तासच लसीकरण झाल्याने त्यांनाही निराश मनाने मागे परतावे लागले. 

वसईतील लसीकरण केंद्रांत झुंबडnवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दोनच लसीकरण केंद्रे असल्याने या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान, १ मे पासून ४ मेपर्यंत एकूण ६९५ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.nवसई-विरारमधील दोन केंद्रांवर १ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील एकूण १३८ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, तर २ मे ला सुट्टी असल्याने लसीकरण झाले नाही. n ३ मे रोजी सोमवारी उशिरापर्यंत वसई डी.एम. पेटिट पालिका रुग्णालयात व विरार बोळिंज केंद्रात ५५७ जणांचे लसीकरण करण्यात आले. मागील तीन दिवसांत वसईत पालिका प्रशासनाने ६९५ लाभार्थ्यांचे लसीकरण केले. वसईत दोनच केंद्रे असल्यामुळे मोठी गर्दी होत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCorona vaccineकोरोनाची लस